janmasthami 2025: जन्माष्टमी दिवशी घरातील तुळशीचे हे उपाय ध्यानात ठेवा; श्रीकृष्णाची कुटुंबावर कृपा

Last Updated:

Janmasthami 2025: जन्माष्टमी दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुळशी भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि श्रीकृष्ण हे विष्णूचेच अवतार आहेत. कृष्ण जन्माष्टमी दिवशी तुळशीचे काही उपाय तुमच्या जीवनात धन आणि समृद्धी आणू शकतात.

News18
News18
मुंबई : गोकुळाष्टमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. यंदा 15 ऑगस्टच्या रात्री जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी बाळकृष्णाची पूजा केल्यानं भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर होतो आणि त्यांना ज्ञान प्राप्त होते, असे मानले जाते. बाळकृष्णाच्या पूजेसोबतच या दिवशी दान देखील केले जाते. जन्माष्टमी दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुळशी भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि श्रीकृष्ण हे विष्णूचेच अवतार आहेत. कृष्ण जन्माष्टमी दिवशी तुळशीचे काही उपाय तुमच्या जीवनात धन आणि समृद्धी आणू शकतात.
कृष्ण जन्माष्टमीला तुळशीचे उपाय
जन्माष्टमीच्या पवित्र प्रसंगी आपल्या तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे श्रीकृष्णासोबतच देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होतात. हा उपाय केल्याने घरात सकारात्मकता येते, तसेच तुम्हाला धन आणि धान्याशी संबंधित त्रासांपासून दिलासा मिळेल.
बाळकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करा: तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला तुळशीची माळ अर्पण केली तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी कमी होतील. यासोबतच तुमची आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगती होते. हा उपाय केल्याने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक आनंद मिळतो.
advertisement
कौटुंबिक सुखासाठी उपाय: घरात नेहमीच आनंद राहावा, असे वाटत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचे रोप घरी आणावे. घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे. घरात हे रोप लावल्यानंतर त्याची दररोज पूजा करावी आणि पूजा केल्यानंतर त्याची 3 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येतो. वैवाहिक जीवनही आनंदी राहते.
advertisement
तुळशीचा हा उपाय प्रत्येक इच्छा पूर्ण करेल: जन्माष्टमीच्या दिवशी भाविक बाळकृष्णाला लाडू, लोणी, खीर इत्यादी अर्पण करतात. या गोष्टी अर्पण करण्यासोबतच तुम्ही श्रीकृष्णाला तुळशी देखील अर्पण करावी. श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण केली तर श्रीकृष्ण तुमच्या इच्छा पूर्ण करतील.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
janmasthami 2025: जन्माष्टमी दिवशी घरातील तुळशीचे हे उपाय ध्यानात ठेवा; श्रीकृष्णाची कुटुंबावर कृपा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement