Vinayak Chaturthi May 2025: बाप्पा मदतीला धावणार, संकट हरणार; ज्येष्ठ विनायक चतुर्थी पूजेचा अभिजीत मुहूर्त साधा

Last Updated:

Vinayak Chaturthi May 2025: मे महिन्याची विनायक चतुर्थी शुक्रवारी 30 मे रोजी साजरी केली जाणार आहे. विनायक चतुर्थीची पूजा शुभ किंवा अभिजीत मुहूर्तावर केल्यानं मोठ्या संकटातून बाप्पा तारतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावेळी विनायक चतुर्थीला २ शुभ योग तयार होत असून...

News18
News18
मुंबई : संकष्टी प्रमाणेच अनेक गणेश भक्त विनायक चतुर्थीची पूजा करतात. मे महिन्याची विनायक चतुर्थी शुक्रवारी 30 मे रोजी साजरी केली जाणार आहे. विनायक चतुर्थीची पूजा शुभ किंवा अभिजीत मुहूर्तावर केल्यानं मोठ्या संकटातून बाप्पा तारतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यावेळी विनायक चतुर्थीला २ शुभ योग तयार होत असून २ प्रकारचे भद्रा देखील आहेत. विशेष म्हणजे विनायक चतुर्थी दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, व्यक्तीच्या इच्छा, मनोकामना त्यामुळे पूर्ण होऊ शकतात. या शुभ प्रसंगी विनायक चतुर्थीचे व्रत करून बाप्पाची पूजा करावी. विनायक चतुर्थी कधी आहे, विनायक चतुर्थी पूजेचा मुहूर्त, शुभ योग आणि भद्र वेळ याबाबत सविस्तर समजून घेऊ.
ज्येष्ठ विनायक चतुर्थी २०२५ -
वैदिक पंचांगानुसार, विनायक चतुर्थीसाठी आवश्यक असलेली ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी तिथी २९ मे रोजी रात्री ११:१८ वाजता सुरू होईल. ही तिथी ३० मे रोजी रात्री ९:२२ पर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदयतिथीच्या आधारावर, विनायक चतुर्थीचे व्रत शुक्रवार, ३० मे रोजी साजरे केले जाईल.
ज्येष्ठ विनायक चतुर्थी मुहूर्त - यावेळी ज्येष्ठ विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी १०:५६ ते दुपारी ०१:४२ पर्यंत आहे. तुम्ही या काळातच विनायक चतुर्थीची पूजा करावी.
advertisement
सर्वार्थ सिद्धी योगात विनायकी - विनायक चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आणि रवि योग तयार होत आहेत. व्रताच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०५:२४ ते रात्री ०९:२९ पर्यंत असेल, तर रवि योग देखील सकाळी ०५:२४ ते रात्री ०९:२९ पर्यंत असेल. चतुर्थीच्या दिवशी दुपारी १२:५७ वाजल्यापासून वृद्धी योग तयार होईल. हे तिन्ही योग शुभफळ देणारे मानले जातात. याशिवाय, व्रताच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र सकाळपासून रात्री ०९:२९ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर पुष्य नक्षत्र असेल.
advertisement
विनायक चतुर्थीला दोन प्रकारचे भद्रकाळ -
३० मे रोजी विनायक चतुर्थीच्या व्रतावर दोन प्रकारचे भद्रकाळ असतील. एक भद्रकाळ स्वर्गातील असेल आणि दुसरा पृथ्वीवरील असेल. प्रथम स्वर्गातील भद्रा सकाळी १०:१४ ते दुपारी ०३:४२ वाजेपर्यंत असेल. या भद्रामध्ये तुम्ही शुभ कार्य करू शकता. त्यानंतर पृथ्वीची भद्रा असेल. ही भद्रा दुपारी ०३:४२ ते रात्री ०९:२२ वाजेपर्यंत असते. या भद्रात महिन्यात कोणतेही शुभ कार्य करू नये.
advertisement
विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व -
विनायक चतुर्थी व्रत केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने संकटे, अडचणी दूर होतात. जीवनात शुभ गोष्टी वाढतात आणि कामे यशस्वी होतात. विनायक चतुर्थी व्रत करणाऱ्याची बुद्धिमत्ता आणि ज्ञान देखील वाढते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vinayak Chaturthi May 2025: बाप्पा मदतीला धावणार, संकट हरणार; ज्येष्ठ विनायक चतुर्थी पूजेचा अभिजीत मुहूर्त साधा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement