Sankashti Chaturthi 2025: मार्गशीर्ष महिन्याची संकष्टी चतुर्थी नेमकी कधी? धार्मिक महत्त्व, पूजा-विधी, शुभ मुहूर्त पाहा

Last Updated:

Sankashti Chaturthi 2025: पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 7 डिसेंबर 2025 रोजी वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी, 8 डिसेंबर 2025 रोजी संपेल. उदयतिथीनुसार रविवारी 7 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल.

News18
News18
मुंबई : श्रीगणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती देवता आहे. तो दु:खहर्ता आणि सुखकर्ता आहे, अशी उपासकांची श्रद्धा असते. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन यथाशक्ती गरीब-गरजूना दान करून उपवास सोडल्यास याच जन्मी समाधानाचे पुण्य प्राप्त करून घेता येते. आपल्या कामात मनोबल वाढण्यास मदत होते. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. जीवन आनंदी, सुखी व समाधानी होण्यास मदत होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीविषयी दा.कृ.सोमण यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
संकष्टी चतुर्थी 2025 मुहूर्त -
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 7 डिसेंबर 2025 रोजी वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी, 8 डिसेंबर 2025 रोजी संपेल. उदयतिथीनुसार रविवारी 7 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:19 ते दुपारी 1:31 पर्यंत आहे. पूजेचा शुभ काळ संध्याकाळी 5:24 ते रात्री 10:31 पर्यंत आहे.
advertisement
चांद्र महिन्याच्या कृष्णपक्षात चंद्रोदयाच्यावेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवशी जर मंगळवार असेल तर ती संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी समजली जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन सोडला जातो. तर काही लोक संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास करतात. उपवास सोडतांना जास्त जेवण घेणे योग्य नसते. शेवटी पूजा, उपवास या गोष्टी ईश्वरासाठी करावयाच्या नसतात. आपले मन:स्वास्थ्य व शरीरस्वास्थ्य चांगले रहावे यासाठी करावयाचे असतात. आपण पूजा - उपवास केल्याने ईश्वरात बदल होत नसतो. आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठीच या गोष्टी करावयाच्या असतात. मन सात्त्विक रहावे यासाठीच या गोष्टी करावयाच्या असतात.
advertisement
माणसाने इतरांशी माणुसकीने वागावे हे महत्त्वाचे असते. गरीब गरजू लोकांना मदत व्हावी यासाठी उपवास सोडताना दान करावयासही सांगण्यात आले आहे. मात्र पूजा-उपवास करतांना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावयाची असते. तसेच उपवास केल्यामुळे जर शरीराला त्रास होणार असेल तर उपवास केला नाही तरी चालतो. त्यामुळे पाप लागत नाही. उपवास असताना विस्मरणामुळे किंवा चुकून खाल्ले तरी पाप लागत नाही. परमेश्वर हा क्षमाशील आहे.
advertisement
महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची साधी सोपी आणि सरळ व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य !
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Sankashti Chaturthi 2025: मार्गशीर्ष महिन्याची संकष्टी चतुर्थी नेमकी कधी? धार्मिक महत्त्व, पूजा-विधी, शुभ मुहूर्त पाहा
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement