Delhi : गाडी कितीही महागडी असू द्या तरी मिळणार नाही इंधन, सरकारने आणलाय नवा नियम

Last Updated:

Delhi vehicle scrap policy: दिल्ली सरकारने 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल गाड्यांना इंधन देण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. नियम मोडल्यास कठोर कारवाई होईल.

News18
News18
Delhi: गाडी किती महागडी असू द्या, तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या तरीही तुम्ही सरकारचा नियम पाळला नाहीत तर तुमची गाडी काही शिल्लक राहणार नाही. तर १० आणि 15 वर्ष जुन्या गाड्यांना पेट्रोल आणि डिझेल देऊ नये अशा सक्त सूचना पेट्रोल पंपांवर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या एकपेक्षा जास्त गाड्या असणाऱ्या ग्राहकांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारने याबाबत आधीच सूचना जारी केल्या होत्या. 10 वर्ष जुन्या डिझेल गाड्या तर 15 वर्ष जुन्या पेट्रोल गाड्या स्क्रॅपमध्ये काढल्या जाणार आहेत. दिल्लीतील आश्रम चौक इथे जुनी मर्सिडिज गाडी पकडण्यात आली असून ती देखील स्कॅपमध्ये जाणार आहे. ऑटोमॅटिक नंबर प्लेट, CCTV कॅमेरा आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीनं ही मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे जुन्या गाड्यांचे मालक आता या गाड्या फार काळ लपवू शकणार नाहीत.
advertisement
दिल्लीतील रस्त्यांवर धावणाऱ्या 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल गाड्या आणि 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल गाड्यांच्या चालकांसाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. आजपासून अशा गाड्यांना दिल्लीतील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. दिल्ली सरकारने दिल्लीतील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
पोलीस आणि अधिकारी तैनात
या निर्णयाबाबत राज्याच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता अत्यंत कठोर दिसत आहेत. हा निर्णय केवळ कागदावर नसून, तो प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण तयारी सरकारने केली आहे. दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस, वाहतूक पोलीस आणि नगर निगम - हे सर्व मिळून या नवीन नियमाची अंमलबजावणी करतील. 350 पेक्षा जास्त पेट्रोल पंप, सीसीटीव्ही, नव्या नंबरप्लेटच्या आधारे या गाड्यांची तपासणी केली जात आहे. कोणीही नजरेतून सुटू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.
advertisement
नियम सोप्या भाषेत समजून घ्या
दिल्लीत आता १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल गाड्यांना आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल गाड्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. याचा अर्थ असा की, जर तुमची गाडी निर्धारित वेळेपेक्षा जुनी असेल, तर ती दिल्लीत चालणार नाही. ती गाडी स्क्रॅपमध्ये जाईल. गाडी दिल्लीची असो किंवा दुसऱ्या कोणत्याही राज्याची असो, जर ती राजधानीत धावत असेल, तर नियम सर्वांवर समान लागू होईल.
advertisement
advertisement
जुनी वाहने कशी पकडली जातील?
दिल्लीतील सर्व पेट्रोल पंपांवर आता ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन) कॅमेरे लावण्यात आले आहेत. कोणतीही गाडी पेट्रोल पंपात प्रवेश करताच, तिची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि काही सेकंदातच ते वाहन 'एंड-ऑफ-लाइफ व्हेइकल (ELV)' आहे की नाही हे कळेल. जर गाडी ELV आढळली, तर तिला इंधन देण्यास नकार दिला जाईल आणि जागेवरच गाडी जप्त केली जाईल. यानंतर ते वाहन स्क्रॅपिंग यार्डमध्ये पाठवले जाईल. उपस्थित पोलीस कर्मचारी किंवा वाहतूक अधिकारी ती गाडी जागेवरच जप्त करू शकतात आणि तिला स्क्रॅपिंग सेंटरमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू करतील.
advertisement
advertisement
नियम मोडल्यास काय होईल?
जर एखाद्या पेट्रोल पंपाने असे वाहन ओळखले असूनही त्याला इंधन दिले, तर त्याच्यावर मोटर वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १९२ अंतर्गत कारवाई केली जाईल. याअंतर्गत मोठा दंड आणि परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते. तर, जर कोणताही वाहन चालक या नियमाकडे दुर्लक्ष करतो, तर त्याची गाडी जप्त केली जाऊ शकते आणि स्क्रॅपमध्ये पाठवली जाऊ शकते.
मराठी बातम्या/ऑटो/
Delhi : गाडी कितीही महागडी असू द्या तरी मिळणार नाही इंधन, सरकारने आणलाय नवा नियम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement