आता Bike कशाला घ्यायची! Maruti ची कार येतेय बुलेटच्या किंमतीत, संपूर्ण यादी पाहाच!

Last Updated:

मध्यमवर्गीयांची फेव्हरेट असलेल्या मारुतीच्या सगळ्याच्या गाड्या आता कमी किंमतीत आल्या आहेत.  नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबर रोजी लागू होतील, जो नवरात्रीचा पहिला दिवस आहे.

News18
News18
मुंबई: केंद्र सरकारने जीएसटी अर्थात  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेच्या स्लॅबमध्ये मोठा बदल केला आहे. आतापर्यंत ज्या दुचाकी आणि कारवर जास्त कर मोजला जात होता, आता त्याच कार आणि SUV स्वस्त झाल्या आहेत. अशातच भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने सुद्धा आपल्या कारच्या किंमती कमी केल्या आहे. मध्यमवर्गीयांची फेव्हरेट असलेल्या मारुतीच्या सगळ्याच्या गाड्या आता कमी किंमतीत आल्या आहेत.  नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबर रोजी लागू होतील, जो नवरात्रीचा पहिला दिवस आहे.
जीएसटी दरांमुळे अनेक वस्तू स्वस्त होणार असल्यानं, कार उत्पादकांनीही त्यांच्या कारसाठी नवीन दर जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही त्यांच्या कारसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. सगळ्यात स्वस्त म्हणजे, मारुतीची मायलेज किंग मारुती सुझुकी एस प्रेसोही सगळ्यात स्वस्त झाली आहे. या कारच्या किंमतीत तब्बल १,२९,६०० कपात करण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत आता 3,49, 900 इतकी झाली आहे.  मारुतीची ही सर्वात स्वस्त कार आहे.
advertisement
मारूती सुझुकी मॉडलएक्स-शोरूम किंमत किती कमी(रुपये)नवीन किंमत (रुपये)
एस-प्रेसो129,600 पर्यंत349,900
मारूती सुझुकी ऑल्टो K10107,600 पर्यंत369,900
मारूती सुझुकी सेलेरियो94,100 पर्यंत469,900
मारूती सुझुकी वॅगन-R79,600 पर्यंत498,900
मारूती सुझुकी इग्निस71,300 पर्यंत535,100
  स्विफ्ट84,600 पर्यंत578,900
  बलेनो86,100 पर्यंत598,900
मारूती सुझुकी टूर S67,200 पर्यंत623,800
मारूती सुझुकी डिजायर87,700 पर्यंत625,600
मारूती सुझुकी फ्रोंक्स112,600 पर्यंत684,900
मारूती सुझुकी ब्रेजा112,700 पर्यंत825,900
मारूती सुझुकी ग्रँड विटारा107,000 पर्यंत1,076,500
मारूती सुझुकी जिम्नी51,900 पर्यंत1,231,500
मारूती सुझुकी इर्टिगा46,400 पर्यंत880,000
मारूती सुझुकी XL652,000 पर्यंत1,152,300
मारूती सुझुकी इनविक्टो61,700 पर्यंत2,497,400
मारूती ईको68,000 पर्यंत518,100
सुपर कॅरी52,100 पर्यंत506,100
advertisement
 GST 2.0 मुळे काय किंमती का कमी झाल्यात?
मारुतीपूर्वी, महिंद्रा आणि टाटा सारख्या अनेक कार ब्रँडने देखील त्यांच्या कारसाठी नवीन दर जाहीर केले आहेत. नवीन जीएसटी नियमांनुसार, १२०० सीसीपेक्षा लहान पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनांना आता १८% स्लॅबमध्ये ठेवण्यात येईल, जे पूर्वीच्या २८% श्रेणीच्या जागी येईल. मोठ्या कार आणि एसयूव्ही आता नवीन ४०% जीएसटी स्लॅबमध्ये येतील, जे पूर्वीच्या ५०% वरून कमी होईल. या बदलाचा अर्थ २२ ​​सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या सर्व हॅचबॅक आणि सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या किमतीत लक्षणीय कपात होईल. या दिवाळी हंगामात ४ मीटरपेक्षा कमी एसयूव्हीवर खरेदीदार ₹१.८६ लाखांपर्यंत बचत करू शकतात.
मराठी बातम्या/ऑटो/
आता Bike कशाला घ्यायची! Maruti ची कार येतेय बुलेटच्या किंमतीत, संपूर्ण यादी पाहाच!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement