पुण्यात गाडीचं रजिट्रेशन, मुंबईत HSRP नंबरप्लेट बसवणं शक्य आहे का? नियम काय सांगतात?

Last Updated:

लोक असे प्रश्न गुगलवर सर्च करु लागले आहेत. कारण बऱ्याच वेळा लोक नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात राहतात. चला तर मग याचे स्पष्ट आणि सोपे उत्तर पाहूया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सरकारने सर्व वाहनांसाठी HSRP (High Security Registration Plate) बसवणे अनिवार्य केले आहे. पण वाहन मालकांना याबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. त्यापैकी एक सर्वात कॉमन प्रश्न असा की "ज्या शहरात वाहन नोंदणी केली आहे तिथे HSRP बसवणे शक्य नसेल, तर आपण एकाच राज्यातील दुसऱ्या शहरात जाऊन HSRP बसवू शकतो का?" किंवा "माझ्या गाडीचं रजिस्ट्रेशन पत्ता एका शहरात आहे आणि आता मी दुसऱ्या शहरात रहातो तर अशावेळी मी काय करु?"
लोक असे प्रश्न गुगलवर सर्च करु लागले आहेत. कारण बऱ्याच वेळा लोक नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात राहतात. चला तर मग याचे स्पष्ट आणि सोपे उत्तर पाहूया.
एकाच राज्यात दुसऱ्या शहरात HSRP बसवता येईल का?
होय, आपण एकाच राज्यातील कुठल्याही RTO किंवा अधिकृत फिटमेंट सेंटरमध्ये HSRP बसवू शकता. त्यामुळे वाहन ज्या शहरात नोंदणीकृत किंवा रजिस्टर आहे, तिथेच त्याची नंबरप्लेट बसवणे बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या शहरात देखील ते बसवू शकता.
advertisement
जर तुमचं वाहन महाराष्ट्रात नोंदणीकृत असेल आणि तुम्ही पुण्यात राहत असाल पण नोकरीमुळे मुंबईत राहता, तर मुंबईतील फिटमेंट सेंटरमध्येही तुम्ही HSRP बसवू शकता. महत्वाचं म्हणजे वाहन त्याच राज्यात नोंदणीकृत असलं पाहिजे.
काय आणि कसं करावं?
ऑनलाइन बुकिंग:
अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला वाहन क्रमांक टाका.
शहर निवडा:
आपल्या सोयीनुसार राज्यातील कोणतेही शहर किंवा फिटमेंट सेंटर निवडा. जे तुम्ही राहात असलेल्या ठिकाणापासून जवळ असेल.
advertisement
स्लॉट बुकिंग: तुम्हाला हवी असलेली तारीख आणि वेळ निवडा. दिलेल्या तारखेला आणि वेळेस गाडी घेऊन फिटमेंट सेंटरला जा. तिथे तुमची HSRP बसवली जाईल.
इतर महत्वाच्या गोष्टी
साधारणतः HSRP फिटमेंट फक्त वाहन ज्या राज्यात नोंदणीकृत आहे, त्याच राज्यात करणे आवश्यक असते.
प्रायव्हेट आणि कमर्शियल वाहन दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी ही प्रक्रिया सारखीच आहे.
advertisement
फिटमेंटच्या वेळी RC (Registration Certificate) आणि वाहनाची प्रत्यक्ष उपस्थिती गरजेची असते.
मराठी बातम्या/ऑटो/
पुण्यात गाडीचं रजिट्रेशन, मुंबईत HSRP नंबरप्लेट बसवणं शक्य आहे का? नियम काय सांगतात?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement