HSRP Number Plate: गाडीला लावली नाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तर किती दंड भरावा लागेल?

Last Updated:

परिवहन विभागाने चार महिन्यांचा कालावधी दिला आहे. वाहन मालकांना ही प्लेट दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि जड वाहनांमध्ये निर्धारित शुल्क भरून बसवता येईल.

News18
News18
मुंबई: सरकारने नवीन नियम आणले आहेत. 2019 पूर्वी ज्या ज्या गाड्यांच्या नंबरप्लेज जुन्या आहेत किंवा 2019 नंतरही ज्या गाड्यांच्या नंबरप्लेज जुन्या आहेत त्यांना नव्या नंबरप्लेट बसवणं बंधनकार आहे.1 एप्रिल 2019 पूर्वी वाहने खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट सक्तीने बसवाव्या लागतील. यासाठी परिवहन विभागाने चार महिन्यांचा कालावधी दिला आहे. वाहन मालकांना ही प्लेट दुचाकी, तीन चाकी, चार चाकी आणि जड वाहनांमध्ये निर्धारित शुल्क भरून बसवता येईल.
काय आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट
HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात 10 अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. यामुळे ही प्लेट छेडछाड करणे शक्य नसते. ही प्लेट दुर्मिळ ॲल्युमिनियम धातूपासून बनलेली असते आणि त्यावर 'IND' बॅजिंग असते, ज्यावर अशोकचक्राचे होलोग्राम हॉट-स्टॅम्प केलेले असते. याव्यतिरिक्त, प्लेटवर रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते, ज्यावर "INDIA" असे नमूद केलेलं असतं.
advertisement
काय आहे उपयोग?
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अधिक सुरक्षित आहे. जिल्हा परिवहन अधिकारी विवेक सिन्हा म्हणाले की, रस्ते अपघात लक्षात घेता, वाहनांचा वेग आणि वाहतूक नियम मजबूत करण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केल्या आहेत.
advertisement
१ एप्रिल २०१९ पूर्वी वाहने चालवणाऱ्या वाहन मालकांनी ही बसवावी लागेल. या नंबरप्लेटमुळे वाहतूक पोलिसांना वाहनांवर लक्ष ठेवणं अधिक सोप होईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सहज पकडता येईल. त्यांच्याविरुद्ध चालान कारवाई करणे सोपे होईल, कारण या प्लेटमध्ये फॉन्ट आणि शैली एकसारखी आहे. जे अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येते.
HSRP नंबरप्लेट न लावल्यास दंड किती?
HSRP नंबरप्लेट बसवण्याची अंतिम तारीख 30 जून देण्यात आली आहे. 30 जूनआधी तुम्हाला हे नंबरप्लेट बसवून घ्यायचं आहे. जर तुम्ही विसरलात किंवा नंबर प्लेट बसवून घेतली नाही तर तुम्हाला 5000 ते 10,000 रुपयांचा दंड बसणार आहे. नियम मोडणाऱ्यांना दुप्पट दंड आकारला जाईल.
मराठी बातम्या/ऑटो/
HSRP Number Plate: गाडीला लावली नाही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तर किती दंड भरावा लागेल?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement