HSRP Number Plate तुम्ही बसवून घेतली का? नसेल तर आजच करा ही शेवटची तारीख

Last Updated:

मुंबईत 30 जून 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत आहे. 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी हा नियम लागू आहे. अंतिम मुदतीनंतर दंड आकारला जाईल.

News18
News18
मुंबई: तुम्ही अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. पुन्हा हाय सिक्युरिटी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ होणार नाही. त्यामुळे अजूनही तुम्ही जर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावली नसेल तर लगेच करून घ्या. राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (High-Security Registration Plate - HSRP) लावण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. ज्या वाहनांची नोंदणी 1 एप्रिल 2019 पूर्वी झाली आहे, अशा मालकांना आता 30 जून 2025 पर्यंत HSRP लावण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी 31 मार्च 2024 पर्यंत होती, जी नंतर 30 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आली होती. HSRP लावण्याच्या प्रक्रियेची गती मंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा नियम विशेषतः 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी आहे हा निर्णय घेण्यात आला आहे. HSRP नंबर प्लेट नसेल कर 30 जूननंतर दंड आकारला जाणार आहे. फॅन्सी नंबर प्लेट पूर्णपणे बेकायदेशीर ठरतील, कारण काही डिझाइन वाचायला कठीण असतात. अंतिम मुदत संपल्यानंतर, अनधिकृत नंबर प्लेट वापरल्यास मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 177 अंतर्गत 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल.
advertisement
काय आहे हाय-सिक्योरिटी नंबर प्लेट?
HSRP एक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली नंबर प्लेट आहे. यात 10 अंकी युनिक लेझर-ब्रांडेड आयडी नंबर आणि लेझरने कोरलेला कोड असतो. यामुळे ही प्लेट छेडछाड करणे शक्य नसते. ही प्लेट दुर्मिळ ॲल्युमिनियम धातूपासून बनलेली असते आणि त्यावर 'IND' बॅजिंग असते, ज्यावर अशोकचक्राचे होलोग्राम हॉट-स्टॅम्प केलेले असते. याव्यतिरिक्त, प्लेटवर रिफ्लेक्टिव्ह फिल्म असते, ज्यावर "INDIA" असे नमूद केलेलं असतं.
advertisement
HSRP कोठून लावावी?
नवीन गाड्यांमध्ये HSRP पूर्वीपासूनच लावलेली असते. पण 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही प्लेट वेगळी लावावी लागेल. महाराष्ट्रातील वाहन मालकांना HSRP फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच लावावी लागेल, जे परिवहन विभागाकडे नोंदणीकृत आहेत. अधिकृत विक्रेत्यांची यादी VAHAN पोर्टलवर उपलब्ध आहे. या पोर्टलवरून माहिती घेऊन वाहन मालक आपल्या गाडीसाठी HSRP बुक करू शकतात. त्यामुळे ज्यांच्या गाड्यांना अजून HSRP लागलेली नाही, त्यांनी आता दिलेली मुदत लक्षात घेऊन त्वरित HSRP लावून घ्यावी, जेणेकरून त्यांना दंड टाळता येईल.
मराठी बातम्या/ऑटो/
HSRP Number Plate तुम्ही बसवून घेतली का? नसेल तर आजच करा ही शेवटची तारीख
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement