Rohit Sharma : कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचे 'सिक्रेट 3 तास', ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी हिटमॅनच्या मनात चाललंय काय?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
रोहित शर्मा पुढील आठवड्यात टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. 19 ऑक्टोबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या वनडे टीममध्ये रोहित शर्मा आहे.
मुंबई : रोहित शर्मा पुढील आठवड्यात टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. 19 ऑक्टोबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या वनडे टीममध्ये रोहित शर्मा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळणार आहे. रोहित शर्माने मागच्या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर यावर्षी मे महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे रोहित आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे. फक्त वनडे क्रिकेट खेळत असल्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीये.
रेव्हस्पोर्ट्झमधील वृत्तानुसार, शनिवारी (4 ऑक्टोबर) भारताच्या वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलेल्या रोहित शर्माने मंगळवारी सकाळी नवी मुंबईमधील घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये तीन तास सराव केला आणि नंतर संध्याकाळी तो सीएट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला.
रोहित शर्माने हे प्रायव्हेट नेट सेशन स्वतः आयोजित केले होते. रोहितने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला होता, जेव्हा त्याच्या नेतृत्वात भारताचा विजय झाला होता. मुंबई इंडियन्सचे फिजिओ अमित दुबे यांच्या देखरेखीखाली आठ ते दहा नेट बॉलरनी रोहित शर्माला तीन तास बॉलिंग केली. ऑस्ट्रेलियातील अतिरिक्त बाऊन्स असलेल्या खेळपट्टीसाठी तयार होण्यासाठी रोहितने प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसमध्ये रोहितने शॉर्ट बॉलचा सामना केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 11:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचे 'सिक्रेट 3 तास', ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी हिटमॅनच्या मनात चाललंय काय?