Mahindra करणार लवकरच धमाका, आणतेय सगळ्यात पॉवरफुल आणि दमदार SUV, झलक पाहून प्रेमात पडाल!

Last Updated:

आता  Mahindra XUV 3XO EV आणि BE6 Rally-E ऑफ-रोडर 2026 मध्ये शोरूममध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.

News18
News18
भारतात सध्या जीएसटी कपातीमुळे ऑटो सेक्टरमध्ये चांगले दिवस आले आहे. तर दुसरीकडे, ईलेक्ट्रिक वाहन सेक्टरमध्येही सर्वच वाहन उत्पादक कंपनींनी एकापेक्षा एक ईव्ही गाड्या लाँच करण्याचा धडाका लावला आहे. देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या  महिंद्रा अँड महिंद्रा आता लवकरत नवीन ICE-ट्यून केलेल्या EV आणि जन्मतः इलेक्ट्रिक SUV सह त्यांचा EV पोर्टफोलिओ मजबूत करणार आहे.  XEV 9e आणि BE6 आधीच लाँच करून महिंद्राने धमाका केला आहे. आता  Mahindra XUV 3XO EV आणि BE6 Rally-E ऑफ-रोडर 2026 मध्ये शोरूममध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.  Mahindra BE 6 Rally-E चे फोटोही व्हायरल झाले आहे.
Mahindra BE 6 Rally-E ही एखाद्या हॉलिवूड सिनेमात दिसणाऱ्या सुपर कारसारखाच लूक आहे.  पहिल्यांदा 2023 महिंद्रा EV फॅशन फेस्टिव्हलमध्ये कन्सेप्ट मॉडेल लाँच केलं होतं. मुळात ही BE 6 चं ऑफ-रोड मॉडेल आहे.  या कारमध्ये जोरदार क्लॅडेड फ्रंट बंपर, C-आकाराचे DRL, गोल हेडलाइट्स, मजबूत टायर्स, स्पोर्टी रिअर बंपर आणि C-आकाराचे टेललँप्स दिले आहेत.
advertisement
सध्याच्या फोटोवरून   Mahindra BE 6 Rally-E  वरच्या बाजूला स्पेअर व्हील आणि छतावर बसवलेले कॅरियर अशा अनेक अॅक्सेसरीज देखील होत्या. महिंद्रा BE 6 रॅली-E चे अधिकृत पॉवरट्रेन तपशील अद्याप उघड झालेले नाहीत. पण, ही  एक इलेक्ट्रिक ऑफ-रोडर ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअप आणि मोठ्या बॅटरी पॅकसह येण्याची शक्यता आहे, जी सुमारे 389 bhp (290 kW) आणि 480 Nm टॉर्क निर्माण करते.
advertisement
नवीन काय?
महिंद्राने अलीकडेच 3 SUV लाँच केले आहे.  थार 3-डोअर, बोलेरो आणि बोलेरो निओ. सर्व मॉडेल्समध्ये कमीत कमी डिझाइन बदल आणि चांगले फीचर अपग्रेड केले आहे. इंजिनमध्ये कोणताही बदल केला नाही. देशांतर्गत ऑटोमेकर २०२६ च्या सुरुवातीला महिंद्रा XUV700 फेसलिफ्ट आणि महिंद्रा XEV 7e देखील लाँच करेल. अपडेटेड XUV700 मध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप (XEV 9e वरून घेतलेला), एक नवीन साउंड सिस्टम आणि पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि हेडलॅम्प असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Mahindra करणार लवकरच धमाका, आणतेय सगळ्यात पॉवरफुल आणि दमदार SUV, झलक पाहून प्रेमात पडाल!
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement