IND vs WI : गंभीरचे फेवरेट टीममध्येच राहणार, दिल्ली टेस्टच्या Playing XI बद्दल मोठी अपडेट

Last Updated:

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरूवात होणार आहे.

गंभीरचे फेवरेट टीममध्येच राहणार, दिल्ली टेस्टच्या Playing XI बद्दल मोठी अपडेट
गंभीरचे फेवरेट टीममध्येच राहणार, दिल्ली टेस्टच्या Playing XI बद्दल मोठी अपडेट
नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला 10 ऑक्टोबरपासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. याआधी अहमदाबादमध्ये झालेला सामना टीम इंडियाने इनिंग आणि 140 रननी जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. दिल्लीमध्ये होणाऱ्या या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते, पण टीम इंडियाचा बॅटिंग प्रशिक्षक रायन टेन डस्काटे याने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार नसल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे साई सुदर्शनला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीची खेळपट्टी कोरडी दिसत असल्यामुळे फास्ट बॉलरना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

नितीश-साईला पुन्हा संधी

'खेळपट्टीवर सध्या भाष्य करणं घाईचं ठरेल, सध्या खेळपट्टी कोरडी दिसत आहे, त्यामुळे फास्ट बॉलरना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. दिल्लीत अशाप्रकारच्या खेळपट्ट्या नवीन नाहीत', असं टेन डस्काटे म्हणाला आहे. 'आम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही. टीम इंडिया सीम-बॉलिंग ऑलराउंडर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, म्हणून नितीशला घरच्या परिस्थितीत संधी दिली जात आहे. त्याला येथे खेळण्याची सवय होईल आणि त्यानंतरच तो परदेशी दौऱ्यांवर चांगली कामगिरी करू शकेल', असं वक्तव्य टेन डस्काटेने केलं आहे.
advertisement

जुरेल तिसऱ्या क्रमांकावर?

'ध्रुव जुरेलने गेल्या आठवड्यात शानदार शतक झळकावले. नंबर-3 आणि नंबर-4 चे स्थान मिळविण्यासाठी नेहमीच स्पर्धा असते. शुभमन नंबर-4 वर फिट आहे. साईला नंबर-3 वर संधी मिळत आहेत, पण त्याला हे देखील माहित आहे की जर तो कामगिरी करत नसेल तर तो त्याचे स्थान गमावू शकतो', असा इशाराही टेन डस्काटेने दिली आहे.
advertisement
'टीम इंडियामध्ये प्रवेश करताना, तुम्हाला माहिती आहे की अशा अडचणी उद्भवतील. साई मानसिकदृष्ट्या मजबूत आहे; त्याला फक्त त्याचे सर्वोत्तम देण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. जर तो चांगली कामगिरी करत नसेल तर व्यवस्थापन निश्चितच नंबर-3 वर जुरेलचा विचार करेल', असे संकेत टीम इंडियाकडून मिळत आहेत.
'टीम इंडियामध्ये प्रत्येक स्थानासाठी खूप स्पर्धा आहे. करुण नायरला सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाली होती, पण इंग्लंडमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नाही, म्हणून आता साई (सुदर्शन) ला संधी दिली जात आहे. पहिल्या सामन्यात तो बॅकफूटवर फॉरवर्ड खेळला, अशा चुका होतात, पण त्याच्या तंत्रात फार दोष दिसत नाहीत. आम्ही त्याला संधी देऊन भविष्यासाठी तयार करू इच्छितो', असं टेन डस्काटने स्पष्ट केलं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : गंभीरचे फेवरेट टीममध्येच राहणार, दिल्ली टेस्टच्या Playing XI बद्दल मोठी अपडेट
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement