IND vs AUS : कॅप्टन बदलला, आता ऑस्ट्रेलियाच्या फ्लाईटही दोन... टीम इंडिया एका बाजूला, विराट-रोहित वेगळे जाणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे टीम 15 ऑक्टोबरला दिल्लीहून दोन वेगवेगळ्या बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे टीम 15 ऑक्टोबरला दिल्लीहून दोन वेगवेगळ्या बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. टुरचा फायनल प्रोग्राम तिकीटांची उपलब्धता आणि व्यवस्थेवर अवलंबून असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंचा एक गट सकाळी रवाना होईल, तर दुसरा गट संध्याकाळी ऑस्ट्रेलियाला जायला निघेल. लांब पल्ल्याच्या विमान प्रवासासाठी बिजनेस क्लास तिकिटांच्या उपलब्धतेवर टीमचं डिपार्चर अवलंबून असणार आहे.
माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर टीम रवाना होण्यापूर्वी दिल्लीत टेस्ट टीमच्या सदस्यांसोबत सामील होतील. एका सूत्राने सांगितले की, 'विराट आणि रोहित प्रस्थानाच्या दिवशी किंवा त्याच्या एक दिवस आधी दिल्लीत पोहोचतील'.
advertisement
टीम इंडिया दिल्लीहून पर्थला रवाना होईल, जिथे पहिली वनडे मॅच 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जर चालू असलेले देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सामने लवकर संपले तर वनडे टीममध्ये निवड झालेल्या खेळाडूंना घरी जाण्यासाठी थोडा ब्रेक मिळू शकतो.
भारतीय टीम 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. निवड समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेत रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला वनडे टीमचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. विराट आणि रोहित वनडे टीमचा भाग आहेत.
advertisement
दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संपूर्ण टीमला त्यांच्या राजिंदर नगर येथील निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले आहे. तीन सामन्यांच्या वनडे सीरिजनंतर, भारत ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची टी-20 सीरिज देखील खेळणार आहे.
भारताची वनडे टीम
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा
advertisement
भारताची टी-20 टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
पहिली वनडे- 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरी वनडे- 23 ऑक्टोबर, ऍडलेड
तिसरी वनडे- 25 ऑक्टोबर, सिडनी
advertisement
पहिली टी-20- 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरी टी-20- 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरी टी-20- 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथी टी-20- 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवी टी-20- 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन
Location :
New Delhi,Delhi
First Published :
October 08, 2025 11:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : कॅप्टन बदलला, आता ऑस्ट्रेलियाच्या फ्लाईटही दोन... टीम इंडिया एका बाजूला, विराट-रोहित वेगळे जाणार!