9 कोटी रुपयांचा कोळसा, रस्त्यावर Lamborghini Aventador कडे लोक पाहतच राहिले!

Last Updated:

लॅम्बोर्गिनीच्या गाड्यांना आग का लागत आहे? त्यांच्या गाड्या सुरक्षित आहेत का? भारतात त्यांना परवानगी द्यावी का?”

News18
News18
एखाद्या रस्त्यावर ईलेक्ट्रिक स्कुटर किंवा उन्हाळ्यामध्ये कारला आग लागल्याच्या घटना नेहमी घडत असतात आणि अशा घटना आपण पाहतही असतो. आग लागल्यामुळे काही क्षणात कार आणि स्कुटरचा जळून कोळसा होतो. त्यामुळे मालकाचं या प्रचंड नुकसान होतं. पण, जर ती कार जर ९ कोटींची असेल तर. दचकू नका, अशी घनटा बंगळुरूमध्ये घडली आहे. Lamborghini Aventador मध्ये अचानक आग लागली आणि बघता बघता ९ कोटी किंमत असलेल्या या कारचा काही क्षणात कोळसा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. एका इन्फ्लुएन्सरचा ही  Lamborghini Aventador कार होती.  Lamborghini Aventador ला आग लागली या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ही कार लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संजीवची होती. ज्याला त्याच्या इन्स्टाग्राम हँडल 'निम्मा माने मग संजू' द्वारे ओळखलं जातं. व्हिडिओमध्ये, कारच्या मागील भागात आग दिसत आहे, जिथे इंजिन बसवलं आहे.
advertisement
मात्र, प्रसिद्ध उद्योजक आणि रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी इंन्साटाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये Lamborghini Aventador च्या इंजिनमध्ये आग लागली आहे.रस्त्याच्या बाजूला ही कार उभी आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Gautam Singhania (@gautamsinghania99)



advertisement
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. ही कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे, परंतु संजयने कारला आग लागल्याची पुष्टी केली आहे, परंतु वाहनाचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही.
आग कशी लागली?
आगीचे खरे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, प्रसिद्ध उद्योजक गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे.  “यावेळी बंगळुरूमध्ये ही आता 'दुर्मिळ घटना' राहिलेली नाही. ही एक पद्धत आहे. लॅम्बोर्गिनी शांत का आहे? त्यांच्या गाड्यांना आग का लागत आहे? त्यांच्या गाड्या सुरक्षित आहेत का? भारतात त्यांना परवानगी द्यावी का?” त्यांना आग का लागते?  असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. बहुतेक आग काही बदलांमुळे लागतात, परंतु काही प्रकरणांमध्ये कार सहन करू शकणारे कमाल तापमान देखील कारण आहे. इंजिन खूप उष्णता निर्माण करते आणि थंड न होता ट्रॅफिकमध्ये बसल्याने देखील अशा आगी लागू शकतात.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
9 कोटी रुपयांचा कोळसा, रस्त्यावर Lamborghini Aventador कडे लोक पाहतच राहिले!
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,, वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement