Thar आता विसरा, Mahindra आणल्या 4 दमदार SUV, लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:

महिंद्राने Freedom NU कार्यक्रमात ऑटोमोबाइल क्षेत्रात एक भन्नाट पर्व सुरू केलं आहे. भारतीय ऑटो दिग्गजाने एकदम चार नवीन SUV कॉन्सेप्ट्सचे अनावरण केले.

+
News18

News18

मुंबई : स्वातंत्र्य दिनी महिंद्राने Freedom NU कार्यक्रमात ऑटोमोबाइल क्षेत्रात एक भन्नाट पर्व सुरू केलं आहे. भारतीय ऑटो दिग्गजाने एकदम चार नवीन SUV कॉन्सेप्ट्सचे अनावरण केले. Vision.T, Vision.S, Vision.SXT आणि Vision.X. एवढंच नाही, तर कंपनीने एकदम नवा NFA प्लॅटफॉर्मही सादर केला आहे, जो अनेक बॉडी स्टाइल्स आणि मल्टिपल पॉवरट्रेनना (ICE, EV, हायब्रिड) सपोर्ट करणार आहे. महिंद्राने आज म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी लाँच केलेल्या नव्या SUV गाड्यांचे फीचर्स आणि यांच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊया.
Vision.T – रॉयल ब्ल्यू-राखाडी लूकमध्ये दमदार SUV
Vision.T ही महिंद्राच्या Thar E चा अपग्रेडेड अवतार असून, ती Nu IQ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. तिचं बॉक्सी आणि मस्क्युलर डिझाइन, फ्लॅट बोनट, नवीन सिक्स-स्लॅट ग्रिल आणि स्क्वेअर हेडलाईट्स यामुळे ती रस्त्यावर एकदम किंग ऑफ द रोड वाटते. ब्ल्यू-राखाडी रंगाचा रॉयल कॉम्बिनेशन तिला प्रीमियम लूक देतो. आतमध्ये मोठा उभा टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि स्टिअरिंगवरच असलेलं स्टार्ट बटण हे सगळं तिचा दर्जा आणखी उंचावतात.
advertisement
Vision.S – पिवळा-करडा (ब्लॅक) कॉम्बिनेशन, दमदार SUV स्टान्स
Vision.S ही कदाचित पुढच्या पिढीची इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड Scorpio असू शकते. उंच स्टान्स, मोठा आणि आक्रमक ग्रिल, आणि रॉयल पिवळा-करडा रंगसंगती तिला एक वेगळाच मजबूत पण स्टायलिश लूक देते. फॅमिली SUV असली तरी तिच्यातला पॉवरफुल रोड प्रेझेन्स खूपच प्रभावी आहे.
advertisement
Vision.X राखाडी-करडा रंग आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स
Vision.X ही SUV Vision.T आणि Vision.S यांच्या मध्ये बसते, पण फॅमिली-ओरिएंटेड असल्यामुळे तिच्या डिझाइनमध्ये स्मूद लाईन्स आणि प्रीमियम फिनिश आहेत. राखाडी-करडा रंग आणि कनेक्टेड LED टेललॅम्प्स तिचं रिच आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व अधोरेखित करतात. आतमध्ये आरामदायी आणि लक्झरी इंटिरियर आहे.
Vision.SXT – रॉयल ब्राऊन रंगातील अ‍ॅडव्हेंचर पिकअप
Vision.SXT ही महिंद्राच्या लाइनअपमधली सगळ्यात अ‍ॅडव्हेंचरस दिसणारी गाडी आहे. क्लॅमशेल बोनट, एक्स्पोज्ड हिंजेस, हेवी-ड्युटी बंपर – सगळं काही तिच्या ऑफ-रोड क्षमतेची खात्री देते. रॉयल ब्राऊन रंगामुळे ही SUV एकदम क्लास अपार्ट दिसते. ही केवळ गाडी नाही, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेस्ट आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Thar आता विसरा, Mahindra आणल्या 4 दमदार SUV, लूक पाहून पडाल प्रेमात!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement