Mahindra Thar पाण्यात झाली गार, हेवी ड्रायव्हरला नको ते धाडस पडलं भारी LIVE VIDEO

Last Updated:

पाणी साचल्यामुळे अनेक वाहनचालकांना पूल ओलांडणे कठीण झालं आहे. अनेक जणांनी पर्यायी रस्त्याचा मार्ग स्विकारला.

News18
News18
नांदेड : राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. ठिकठिकाणी नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. अशावेळी नाल्यावरून किंवा पुराच्या पाण्यात जाऊ नका असं वारंवार आवाहन केलं जात असतं. पण तरीही काही महाभाग नको ते धाडस करतात आणि जीव धोक्यात घालतात. अशाच नांदेडमधून एक घटना समोर आली आहे. महिंद्रा थार चालकाने साचलेल्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला पण थारची बोट झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू आहे. शनिवारी सुद्धा सकाळपासून पाऊस सुरू आहे. हिमायतनगर तालुक्यात हदगाव -हिमायतनगर रस्त्यातील अंडरब्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे अनेक वाहनचालकांना पूल ओलांडणे कठीण झालं आहे. अनेक जणांनी पर्यायी रस्त्याचा मार्ग स्विकारला.
advertisement
अशातच  हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जवळची ही घटना आहे. हदगाव -हिमायतनगर रस्त्यातील अंडरब्रीजजवळ एक महिंद्रा Thar गाडी पोहोचली. लोकांनी त्याला गाडी पाण्यात घालू नको असं आवाहन केलं. पण आपल्याकडे तर महिंद्रा Thar आहे, असं म्हणत या पठ्याने  पाण्यातून थार नेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
काही अंतर तो पोहोचला खरा पण ब्रीजमध्ये पाणी जास्त असल्याने कारमध्येच बंद पडली. थार निम्मी पाण्याखाली गेली होती.  आता पाणी इंजिनमध्ये गेल्यामुळे गाडी बंद पडली अन् थार पाण्याच्या बोटीसारखी फिरायला लागली. स्थानिकांनी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात केला. सुदैवाने लोकांनी धाव घेऊन लगेच थार चालकाला बाहेर काढलं. त्यामुळे पुढी अनर्थ टळला. मात्र, या गाडी पाण्यात बुडाली आहे, त्यामुळे थारचालकाचं मोठं नुकसान झालं आहरे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Mahindra Thar पाण्यात झाली गार, हेवी ड्रायव्हरला नको ते धाडस पडलं भारी LIVE VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement