Maruti Wagon R आता बाजूला करा, घरी आणा फॅमिलीसाठी Ertiga, इतकी किंमत झाली कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
सगळ्याच कार उत्पादक कंपन्यांनी कारच्या किंमतच्या कमी केल्याचं जाहीर केलं आहे. मारुती सुझुकीची मध्यमवर्गीयांची फेव्हरेट Maruti Suzuki Ertiga च्या किंमतीमध्येही कपात झाली आहे.
केंद्र सरकारने जीएसटीच्या कर रचनेत बदल केला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात बदल पाहण्यास मिळत आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांचं कार उत्पादक कंपन्यांनी कारच्या किंमतच्या कमी केल्याचं जाहीर केलं आहे. मारुती सुझुकीची मध्यमवर्गीयांची फेव्हरेट Maruti Suzuki Ertiga च्या किंमतीमध्येही कपात झाली आहे. नवीन GST किंमती 22 सप्टेंबर, 2025 पासून लागू होतील. नवीन GST स्लॅब लागू होण्याआधीच मारूतीने आपल्या कारच्या किंमती जाहीर केल्या आहेत. यात Maruti Suzuki Ertiga आता १.११ लाख रुपयांनी स्वस्त होणार आहे.
मारुती सुझुकीने देखील आपल्या मॉडेल लाइनअपमध्ये 30,000 रुपये ते 1.11 लाख पर्यंतची किंमत कपात जाहीर केली आहे. भारतातील सर्वाधिक विकली जाणारी MPV, Maruti Suzuki Ertiga आता 47,000 हजार रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. एंट्री-लेव्हल LXI आणि VXI मॅन्युअल वेरिएंट्समध्ये हे क्रमाने 32,000 आणि 36,000 पर्यंतची किंमत कपात झाली आहे. ZXI मॅन्युअल वेरिएंटची किंमत 39,000 रुपयांनी कमी झाली आहे, तर ZXI+ मॅन्युअल ट्रिम आता 41,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे.
advertisement
| ERTIGA व्हेरिएंट्स | नवी किंमत | जुनी किंमत | GST 2.0 ने कपात |
| LXI MT | Rs 8.80 लाख | Rs 9.12 लाख | Rs 32,000 |
| VXI MT | Rs 9.85 लाख | Rs 10.21 लाख | Rs 36,000 |
| ZXI MT | Rs 10.92 लाख | Rs 11.31 लाख | Rs 39,000 |
| ZXI+ MT | Rs 11.59 लाख | Rs 12 लाख | Rs 41,000 |
| VXI AT | Rs 11.20 लाख | Rs 11.61 लाख | Rs 41,000 |
| ZXI AT | Rs 12.27 लाख | Rs 12.71 लाख | Rs 44,000 |
| ZXI+ | Rs 12.94 लाख | Rs 13.41 लाख | Rs 47,000 |
| VXI CNG | Rs 10.77 लाख | Rs 11.16 लाख | Rs 39,000 |
| ZXI CNG | Rs 11.83 लाख | Rs 12.25 लाख | Rs 42,000 |
| Tour M MT | Rs 9.82 लाख | Rs 10.18 लाख | Rs 36,000 |
| Tour M CNG | Rs 10.74 लाख | Rs 11.12 लाख | Rs 38,000 |
advertisement
42,000 रुपयांची बचत
view commentsVXI, ZXI आणि ZXI+ ऑटोमॅटिक व्हेरिएंट्स आता 41,000, 44,000 आणि 47,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. CNG VXI आणि ZXI ट्रिम्सचे ग्राहक अनुक्रमे 39,000 आणि 42,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. फ्लीट-ओरिएंटेड टूर एम एमटी आणि सीएनजी व्हेरिएंट्समध्ये अनुक्रमे 36,000 आणि 38,000 ची कपात झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 11:40 PM IST


