Royal Enfield Meteor 350: किती दिवस बुलेट चालवणार? आली रॉयल क्रुझर बाईक, लूक दमदार!
- Published by:Sachin S
Last Updated:
Royal Enfield Meteor 350 मध्ये एक्सेसरीज दिल्या आहे, ज्यामुळे ग्राहक बाईकला आणखी चांगलं कस्टमाईज करू शकतात
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर आता वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत. अशातच आता रॉयल एनफिल्डने Royal Enfield Meteor 350 लाँच केली आहे. Meteor 350 ही ४ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये फायरबॉल, स्टेलर, ऑरोरा आणि सुपरनोवा असे व्हेरिएंट दिले आहे. या बाईकची किंमत 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) पासून सुरू होते. या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. डिलिव्हरी २२ सप्टेंबर २०२५ पासून दिली जाईल.
Royal Enfield Meteor 350 मध्ये डिझाईनमध्ये बदल केले आहे. Royal Enfield Meteor 350 मध्ये एक्सेसरीज दिल्या आहे, ज्यामुळे ग्राहक बाईकला आणखी चांगलं कस्टमाईज करू शकतात. ही बाईक डिलरशिप आणि ऑनलाइन RE च्या ऑफिशियल ‘मेक इट योर‘ चॅनलवर उपलब्ध आहे. या बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टर्न इंडिकेटर्स, अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लिव्हर्स, यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंग पोर्ट आणि ट्रिपर नेव्हिगेशन पॉड असिस्ट आणि स्लिपर क्लच दिला आहे.
advertisement
नवी कलर ऑप्शन?
Royal Enfield Meteor 350 मध्ये ऑरोरा रेट्रो, फायरबॉल ऑरेंज, फायरबॉल ग्रे, स्टेलर मरीन ब्लू, स्टेलर मॅट ग्रे, ऑरोरा रेड, ऑरोरा रेट्रो ग्रीन आणि सुपरनोवा ब्लॅक समावेश केला आहे. 2025 रॉयल एनफील्ड Meteor 350 मध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर/ऑयल-कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 6,100rpm वर 20.2bhp ची जास्त पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm इतका मॅक्सिमम टॉर्क जनरेट करतो. या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.
advertisement
सस्पेंशन आणि ब्रेकिंग
Meteor 350 मध्ये सस्पेंशन, ब्रेक्सचं सेटअप 41mm टेलीस्कोपिक फ्रंट आणि रिअरमध्ये ट्विन-साइडेड शॉक एब्जॉर्बर्स दिले आहे. हे अलॉय व्हिल्ससह ट्युबलेस टायर्स दिले आहे. अपडेटेडMeteor 350 ची लांबी 2,140mm, रुंदी 845mm आणि उंची 1,140mm आहे. यामध्ये 1,400mm चा व्हिलबेस दिला आहे. तर 765mm सीट हाईट आणि 170mm चा ग्राउंड क्लियरन्स दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 10:42 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Royal Enfield Meteor 350: किती दिवस बुलेट चालवणार? आली रॉयल क्रुझर बाईक, लूक दमदार!