Makar Sankranti 2026: एरव्ही अशुभ, पण मकर संक्रातीला काळ्या रंगाचे कपडे घालणं शुभ? शनिशी थेट संबंध
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti 2026: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्य कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हटले जाते. या दिवसापासून सूर्य उत्तरायण व्हायला सुरुवात होते. यावर्षी सूर्य देव 14 जानेवारी 2026 रोजी राशी परिवर्तन करत असल्यामुळे मकर संक्रांतीचा सण...
मुंबई : नवीन वर्षातील महत्त्वाच्या सणांमध्ये पहिला सण मकर संक्रातीचा असतो. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी हा प्रामुख्याने सूर्य उपासना आणि नवीन पिकाच्या स्वागताचा सण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्य कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हटले जाते. या दिवसापासून सूर्य उत्तरायण व्हायला सुरुवात होते. यावर्षी सूर्य देव 14 जानेवारी 2026 रोजी राशी परिवर्तन करत असल्यामुळे मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे.
साधारणपणे कोणत्याही सणाला किंवा पूजेला काळे कपडे घालणे अशुभ मानले जात असले, तरी मकर संक्रांतीला मात्र काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी सूर्य त्याचा शत्रू मानल्या जाणाऱ्या शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि काळ्या रंगाचा संबंध शनी ग्रहाशी असल्याने, या दिवशी काळे कपडे परिधान केल्याने शनीची विशेष कृपा मिळते. आपल्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मकर संक्रांतीला प्रामुख्याने काळे कपडे घातले जातात. याशिवाय हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो आणि मकर संक्रांतीचा दिवस खूप थंड असतो, अशा वेळी काळे कपडे शरीराला उष्णता देतात, या धार्मिक आणि नैसर्गिक मान्यतेमुळे ही परंपरा आहे.
advertisement
मकर संक्रांतीला तीळ-गुळ आणि खिचडी खाण्याची विशेष परंपरा आहे. तीळ आणि गुळ शरीराला आवश्यक उब देतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात त्यांचे सेवन करणे चांगले असते. या दिवशी स्वतः खिचडी खाणे आणि गरीबांना खाऊ घालणे यामुळे सूर्य देव आणि शनी देवांसह सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते.
advertisement
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा काळ सौर कॅलेंडरनुसार खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दानधर्माला मोठे महत्त्व असते. मकर संक्रांतीला केलेले दान इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. प्रामुख्याने तीळ, गूळ, ब्लँकेट आणि धान्याचे दान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते.
advertisement
विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर, मकर संक्रांतीपासून दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान होऊ लागतात. यामुळे थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होऊन वसंत ऋतूचे आगमन व्हायला सुरुवात होते. उत्तरायणाच्या या काळात सूर्याची किरणे अधिक प्रखर होतात, जी आरोग्यासाठी आणि पिकांसाठी फायदेशीर असतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:28 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Makar Sankranti 2026: एरव्ही अशुभ, पण मकर संक्रातीला काळ्या रंगाचे कपडे घालणं शुभ? शनिशी थेट संबंध











