GST कर बदलाचा पहिला बळी, बुलेटसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, रॉयल एनफिल्डला शॉक!

Last Updated:

जीएसटी कर प्रणालीत बदल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये या निर्णयामुळे 'कही खुशी कही गम' अशी अवस्था आहे.

News18
News18
केंद्र सरकारने जीएसटीच्या कर रचनेमध्ये मोठा बदल केला आहे. आता यापुढे २८ टक्के कर द्यावा लागणार नाही. २८ टक्के कर ज्या वस्तूंवर लागू होता तो आता १८ टक्के द्यावा लागणार आहे. याचा परिणाम हा सर्वच क्षेत्रात झाला आहे. काही वस्तू स्वस्त झाल्या आहे तर काही वस्तू या महाग झाल्या आहे. महाग वस्तूंमध्ये 350 सीसीपेक्षा जास्त असणाऱ्या बाइकच्या किंमती वाढणार आहे. याचा फटका थेट रॉयल एनफिल्डला बसला आहे. रॉयल एनफिल्डचे बेसिक मॉडेल हे ३५० सीसीपासून सुरू होतं. त्यामुळे आता ४० टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे.
जीएसटी कौन्सिल परिषदेनं जीएसटी कर प्रणालीत बदल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ५ टक्के, १२ टक्के आणि १८ टक्के हा स्लॅब असणार आहे. आता ऑटो इंडस्ट्रीमध्ये या निर्णयामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था आहे. बाईक सेक्टरमध्ये  350cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींवरील GST 28% वरून 40% पर्यंत वाढला. नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होतील. म्हणजेच, आता जर तुम्ही बुलेट किंवा क्लासिक 350 सारख्या 350cc पर्यंतच्या बाईक खरेदी केल्या तर ते ठीक आहे, परंतु जर तुम्ही त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक खरेदी केल्या तर तुमचा खिसा मोकळा होईल. कारण, आता तुम्हाला यावर 12 टक्के अधिक कर भरावा लागेल.
advertisement
या बाईक होणार महाग
"मध्यम आकाराच्या आणि मोठ्या कार, 350cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी, वैयक्तिक वापरासाठी विमाने... या सर्वांवर 40% कर आकारला जाणार आहे.  भारतातील प्रीमियम मोटरसायकल विभागासाठी हे पाऊल महत्त्वाचं आहे, ज्या गाड्यांची क्षमता ही कमी आहे. पण  भारतात या विभागात रॉयल एनफील्ड, ट्रायम्फ, केटीएम, हार्ले-डेव्हिडसन सारखे ब्रँडसाठी मात्र झटका आहे. आतापर्यंत ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकलींवर २८% जीएसटी आणि ३% सेस लावला जात होता.
advertisement
रॉयल एनफील्डच्या गाड्या होणार महाग
आता जीएसटीच्या करात बदल झाल्यामुळे रॉयल एनफील्डवर याचा परिणाम होईल. कारण, रॉयल एनफिल्ड भारतातील मध्यम आकाराच्या बाइक बाजारपेठेतील आघाडीचा ब्रँड आहे आणि त्याने इंटरसेप्टर, कॉन्टिनेंटल जीटी, सुपर मेटीओर आणि ४५० सीसी इंजिन-आधारित हिमालयनसह त्याच्या ६५० सीसी लाइनअपसाठी मजबूत फॉलोअर्स तयार केले आहेत. पण, त्याची बहुतेक विक्री ३५० सीसी श्रेणीतून होते.
advertisement
रॉयल एनफील्डला हवा होता एक समान कर
मागील आठवड्यात, आयशर मोटर्सचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ लाल यांनी धोरणकर्त्यांना सर्व दुचाकी वाहनांवर एकसमान १८% वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची विनंती केली होती, असं म्हटलं होतं की, विभाजित कर रचनेमुळे भारताचे जागतिक नेतृत्व कमकुवत होऊ शकतं, गुंतवणूक रोखू शकते आणि परदेशी स्पर्धकांसाठी संधी निर्माण होऊ शकते.
advertisement
३५० सीसी सेगमेंटमध्ये बाइकची क्रेझ
भारतातील प्रीमियम मोटारसायकलची जागा, जरी कॉम्युटर सेगमेंटपेक्षा लहान असली तरी, एकूण दुचाकी बाजारपेठेपेक्षा वेगाने वाढत आहे. उद्योगाच्या आकडेवारीनुसार, अलिकडच्या वर्षांत ३५० सीसीपेक्षा जास्त मोटारसायकलींची विक्री झपाट्याने वाढली आहे, ज्याचे प्रमुख कारण शहरी व्यावसायिक आणि एंट्री-लेव्हल बाइक्समधून अपग्रेड करणारे तरुण ग्राहक आहेत. एकट्या रॉयल एनफील्डने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३५० सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या १.४ लाख मोटारसायकली विकल्या, ज्याची वार्षिक वाढ ४०% आहे. दुसरीकडे, बजाज ऑटोने १.५५ लाख युनिट्स विकल्या, ज्याची वार्षिक वाढ २२% आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
GST कर बदलाचा पहिला बळी, बुलेटसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, रॉयल एनफिल्डला शॉक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement