Suzuki ची सुपरबाइक दिवाळीला आणा घरी, कंपनीकडून सुरू आहे 100 टक्के लोन ऑफर!

Last Updated:

दिवाळी सण आल्यामुळे कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर देत आहे. अशातच भारतात दमदार आणि स्टायलिश बाईक उत्पादक कंपनी सुझुकीनेही आपल्या बाईकवर बेस्ट अशा ऑफर आणल्या आहेत. 

News18
News18
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच दिवाळी सण आल्यामुळे कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर देत आहे. अशातच भारतात दमदार आणि स्टायलिश बाईक उत्पादक कंपनी सुझुकीनेही आपल्या बाईकवर बेस्ट अशा ऑफर आणल्या आहेत. 150cc ते 160cc सेगमेंटमध्ये Suzuki Gixxer आणि Gixxer SF या बाईकवर कंपनी खास ऑफर दिली आहे. Suzuki Motorcycle India Pvt Ltd (SMIPL) ने सणासुदीच्या हंगामापूर्वी  Festive Season ऑफर सुरू केली आहे. याामध्ये बाईकवर तुम्हाला १०० टक्के लोन घेता येणार आहे.
दिवाळीच्या हंगामात  Suzuki Motorcycles India ने त्यांच्या 155cc Gixxer लाइनअपमध्ये नवीन अपडेट दिली आहे.  Gixxer आणि Gixxer SF या दोन्ही बाईकमध्ये 155cc इंजन आहे. या दोन्ही बाईकमध्ये आता नवीन कलर पर्यायांसह अपडेट केलं आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने विक्रीसाठी आकर्षक फेस्टिव्हल ऑफर दिली आहे.
Gixxer 3 कलर पर्याय
Gixxer सोबत तीन नवीन कलर ऑप्शन दिले आहे. यामध्ये Metallic Oort Gray + Pearl Mira Red, Glass Sparkle Black + Metallic Oort Gray आणि Metallic Triton Blue + Glass Sparkle Black यांचा समावेश आहे. या बाईकची किमती  1,26,421 रुपये (Ex-sh, दिल्ली) पासून सुरू होते.  याशिवाय, ग्राहकांना दिवाळीच्या ऑफरमध्ये खरेदी केली तर  5 हजारांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट्स आणि  6 हजारांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट्स मिळवू शकतात.
advertisement
advertisement
Gixxer SF मध्ये नवीन अपडेट
दुसरीकडे, Gixxer SF  मध्ये २ नवीन कलर पर्याय सुद्धा दिले आहे.  यामध्ये Metallic Oort Gray + Pearl Mira Red आणि Glass Sparkle Black + Metallic Oort Gray यांचा समावेश आहे. या बाईकची किंमत  1,37,231 (Ex-sh, दिल्ली) पासून सुरू होते. या शिवाय, या बाईकच्या खरेदीवर ग्राहकांसाठी 5 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि 7 हजारांपर्यंत इन्शुरन्स समावेश आहे.
advertisement
100% लोन मिळणार
Gixxer  आणि  Gixxer SF  दोन्ही बाइक्स 2 हजार रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर वाढीव वॉरंटीसाठी देखील पात्र आहेत. तसंच कंपनीकडून या दोन्ही बाईकवर UPTO 100% लोन देण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे. ग्राहकांच्या आर्थिक परिस्थिती पाहून हे लोन दिलं जाईल.  कंपनीे देखील Suzuki Moto Fest चे आयोजन केलं आहे, जिथे ग्राहक Gixxer रेंजच्या मोटरसायकल्सचा अनुभव घेऊ शकतात आणि टेस्ट राईड तसंच खरेदीवर खात्रीपूर्वक भेटवस्तू  मिळवू शकतात.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
Suzuki ची सुपरबाइक दिवाळीला आणा घरी, कंपनीकडून सुरू आहे 100 टक्के लोन ऑफर!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement