Car: 30 लाखांची BMW भारतात मिळते 2 कोटींना, हे कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का!
- Published by:sachin Salve
Last Updated:
आपल्या दारात कार असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेक जण आपलं स्वप्न सत्यातही उतरवतात. पण तुम्हाला माहितीये का...
मुंबई : आपल्या दारात कार असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. अनेक जण आपलं स्वप्न सत्यातही उतरवतात. पण तुम्हाला माहितीये का भारतात एखादी कार घ्यायची असेल तर लाखो रुपये टॅक्स द्यावा लागतो. हे आपल्याच देशामध्ये नाहीतर इतर देशामध्येही हेच गणित आहे. प्रत्येक देश हा आपल्या धोरणानुसार कर आकारणी करत असतो. टॅरिफचा परिणाम हा फक्त एखाद्या देशावर होत नाही तर तो थेट ग्राहकांवर होत असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, दुबईमध्ये फक्त ३० लाख रुपयांना विकली जाणारी एसयूव्ही भारतात येईपर्यंत २ कोटी रुपयांची होते.
भारतातही लँड क्रूझरचे अनेक चाहते आहेत, पण ही कार इतकी महाग आहे की, सामान्य माणूस ती खरेदी करण्याचा विचारही करू शकत नाही. भारतात त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे, तर दुबईमध्ये तुम्ही तीच कार फक्त ३० लाख रुपयांना खरेदी करू शकता. मग किंमतीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त फरक का आहे? त्याचप्रमाणे, अमेरिकेत फक्त ५५ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या BMW X5 ची किंमत भारतात येताच १ कोटी रुपयांच्या पुढे जाते.
advertisement
परदेशाात गाड्या इतक्या स्वस्त का?
भारतात २ कोटींना मिळणारी रेंज रोव्हर अमेरिकेत फक्त ८० लाख रुपयांना मिळते, तर ५० लाखांची फॉर्च्युनर कार दुबईत फक्त ३५ लाख रुपयांना मिळते. BMW X5 दुबईमध्ये ७५ लाख रुपयांना उपलब्ध असेल, जी भारतात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली जाते. किमतींमधील हा फरक केवळ भारत सरकार या उत्पादनांवर लावत असलेल्या करामुळे आहे, असं गुंतवणूक बँकर सार्थक आहुजा यांनी सांगितलं.
advertisement
भारत किती आकारला जातो कर?
भारतात या गाड्यांच्या किंमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण कर आहे. सरकार लक्झरी गाड्यांवर ६० ते १०० टक्के आयात शुल्क आकारते. याशिवाय २८ टक्के जीएसटी देखील आकारला जातो. एवढंच नाही तर या जीएसटी रक्कमेवर सेस देखील आकारला जातो. त्याशिवाय सरकार कार खरेदीदाराकडून रोड टॅक्स देखील वसूल करतो. अशाप्रकारे, आयात शुल्काव्यतिरिक्त, कारच्या प्रत्यक्ष किंमतीच्या सुमारे ४५ टक्के रक्कम कर म्हणून वसूल केली जाते.
advertisement
...म्हणून दुबईत कार स्वस्त
या गाड्यांच्या किमतींमध्ये फरक इतका जास्त आहे कारण दुबईसारख्या देशांमध्ये आयात शुल्क खूप कमी आहे आणि त्यावरील कर देखील खूप कमी आहे. टाटा आणि मारुती सारख्या कंपन्यांच्या गाड्या भारतात खूपच स्वस्त आहेत कारण त्या इथंच तयार केल्या जातात आणि आयात शुल्कासारख्या घटकांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. जेव्हा याच गाड्या इतर देशांमध्ये जातात तेव्हा त्यांच्या किमती तिथे वाढलेली असते.
Location :
First Published :
May 07, 2025 8:57 PM IST