Diwali 2025: यंदा 20 की 21 ऑक्टोबर... नेमकी दिवाळी कधी? पुण्यातील ज्योतिषांनी दिली संपूर्ण माहिती, धनत्रयोदशी ते भाऊबीज अचूक तारखा!
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Diwali 2025: हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशी ते भाऊबीज अचूक तारखा आणि शुभ मुहूर्त यांबाबत जाणून घेऊ.
हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा या सणांना खास महत्त्व असतं. यंदा म्हणजेच 2025 च्या दिवाळीत हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत? आणि यंदाची दिवाळी नेमकी कधी आहे? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. याबाबत पुण्यातील पुजारी अशोक पाटील यांनी माहिती दिलीये.
advertisement
advertisement
धनत्रयोदशी (18 ऑक्टोबर 2025): दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी होय. या दिवशी मुख्यतः खरेदी करणे आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला विशेष महत्त्व आहे. घरात सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. यंदा खरेदीसाठी शुभ वेळ दुपारी 12:18 पासून 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पर्यंत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement