Devendra Fadnavis : तो सिनेमा कोणता ज्यामुळे वाढल्या CM फडणवीसांच्या समस्या? म्हणाले, 'मी जिथे जातो तिथे लोक मला...'

Last Updated:

Devendra Fadnavis on Movie : मुंबईत झालेल्या FICCI Frames च्या 25 व्या आवृत्तीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.

News18
News18
मुंबई : चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. समाजात जे घडतं ते मोठ्या पडद्यावर दाखवलं जातं. त्या सिनेमांचा समाजावर इतका प्रभाव पडतो की अनेक लोक ते खरं आहे असं समजू लागतात. बॉलिवूडचा असाच एक सिनेमा जो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. पण या सिनेमामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समस्या वाढल्या.
मुंबईत झालेल्या FICCI Frames च्या 25 व्या आवृत्तीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मजेशीर प्रसंग सांगितला. या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. असा कोणता चित्रपट आहे का ज्याने तुमच्यावर खोलवर छाप सोडली आहे? असा प्रश्न अक्षयने मुख्यमंत्र्यांना विचारला. याचं उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले, "त्या फिल्मनं मला प्रभावित केलंच पण त्या फिल्मनं माझ्यासाठी एवढ्या समस्या वाढवल्या. ती फिल्म आहे 'नायक'. या फिल्ममध्ये अनिल कपूर एका दिवसाचे मुख्यमंत्री बनून दिवसभरात एवढी कामं करतात की मी जिथे कुठे जातो, तिथे लोक मला सांगतात की, नायक सारखं काम करा. एका दिवसात त्यांनी किती काय काय केलं. कसं एकाच दिवसांत त्यांनी सगळंच बदललं."
advertisement
फडणवीसांनी अनिल कपूर यांच्या भेटीचा किस्सा सांगितला ते म्हणाले, "मला एक दिवस अनिल कपूर भेटले त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, तुम्हा का बनवलीय नायक? तुम्ही 'नायक' आणि आम्ही 'नालायक'. एकाच दिवसांत तु्म्ही एवढ्या गोष्टी कशा केल्या?"
advertisement
"मला असं वाटतं की, एक बेंचमार्क सेट करण्याचं काम त्यांनी केलंय. पण चित्रपटांनी एक माणूस म्हणून माझ्या संवेदना जागृत केल्यात. अनेकदा असं होतं की, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही एखादं काम सारखं-सारखं केलं की तुमचे इमोशन्स थोडे कमी होतात. पण ते इमोशन्स जिवंत ठेवण्याचं काम फिल्म्सनी केलंय", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते तुम्ही जर एक दिवसाचे दिग्दर्शक बनले तर पहिला सीन कोणता दिग्दर्शित कराल? असा प्रश्न विचारला असता उत्तर देत फडणवीस म्हणाले, "जर महाराष्ट्रावर फिल्म बनत असेल तर पहिला सीन छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल. राज्याभिषेकासाठी सिंहासनावर आरुढ झाले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामगिरीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचा निर्माण हाच त्या सिनेमाचा पहिला सीन असेल."
मराठी बातम्या/मनोरंजन/
Devendra Fadnavis : तो सिनेमा कोणता ज्यामुळे वाढल्या CM फडणवीसांच्या समस्या? म्हणाले, 'मी जिथे जातो तिथे लोक मला...'
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement