Shreyas Iyer : ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्हाईस कॅप्टन्सी मिळताच श्रेयस अय्यरला 'जोर का झटका', 3 दिवसात मिळाली 'बॅड न्यूज'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Punjab Kings Bowling Coach Resign : सुनील जोशी यांनी आयपीएलमधील स्पिन बॉलिंग कोच जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
IPL 2026 News, Punjab Kings : वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट मालिका सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यामध्ये श्रेयस अय्यरला लॉटरी लागली. श्रेयस अय्यरल याला वनडे संघाच्या व्हाईस कॅप्टनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, तीन दिवसातच श्रेयस अय्यर याला बॅड न्यूज मिळाली आहे.
स्पिन बॉलिंग कोचचा राजीनामा
पंजाब किंग्स (Punjab Kings) टीमचे स्पिन बॉलिंग कोच (Spin Bowling Coach) सुनील जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जोशी यांनी आयपीएल मधील स्पिन बॉलिंग कोच जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएलपूर्वी श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील जोशी लवकरच बीसीसीआय (BCCI) च्या सेंटर ऑफ एक्सलन्स (Centre of Excellence - CoE) मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारण्याची शक्यता आहे. हे CoE बंगळूर येथे स्थित आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय क्रिकेटला CoE मार्फत मिळू शकेल. गेल्या हंगामात संघाच्या यशात प्रशिक्षकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
advertisement
IPL 2026 साठी अनुपलब्ध
पंजाबच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देत क्रिकबझला सांगितलं आहे की, सुनील जोशी यांनी आम्हाला आगामी हंगामासाठी त्याच्या अनुपलब्धतेबद्दल माहिती दिली आहे. ते एक अद्भुत व्यक्ती होता आणि त्याचे फ्रँचायझीशी चांगले संबंध होते, परंतु आम्हाला कोणाच्याही कारकिर्दीच्या वाढीला अडथळा आणायचा नाही.
सुनील जोशी कोण आहेत?
advertisement
सुनील जोशी यांचा पंजाब किंग्ज सोबतचा हा दुसरा कार्यकाळ होता. त्यांनी यापूर्वी 2020 ते 2022 पर्यंत अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखाली संघात काम केले होते. 2025 मध्ये रिकी पॉन्टिंग प्रशिक्षक झाल्यानंतर ते संघात परतले होते. ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूशी त्यांचे चांगले संबंध होते. जोशी यांनी भारतासाठी 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने खेळले. ते 1996 ते 2001 पर्यंत टीम इंडियाचा भाग होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : ऑस्ट्रेलियाविरुद्ध व्हाईस कॅप्टन्सी मिळताच श्रेयस अय्यरला 'जोर का झटका', 3 दिवसात मिळाली 'बॅड न्यूज'