कारचं रबर, प्लास्टिक, पेंट सगळं कव्हर होतं, तुमच्याकडे कार असेल तर झिरो डेप्थ इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहित असायलाच हवं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
झिरो डेप्थ इन्शुरन्सचं नाव अनेकांनी ऐकलं असेल पण हे नक्की काय आहे? त्याचा फायदा काय? याबद्दल अनेकांना माहित नसेल.
मुंबई : झिरो डेप्थ इन्शुरन्सचं नाव अनेकांनी ऐकलं असेल पण हे इन्शुरन्स नक्की काय आहे? त्याचा फायदा काय? याबद्दल अनेकांना माहित नसेल. चला याबद्दल जाणून थोडी माहिती घेऊ. झिरो डेप्थ इन्शुरन्स म्हणजेच बम्पर-टू-बम्पर इन्शुरन्स हा एक असा वाहन विमा प्रकार आहे, ज्यामध्ये कारच्या अपघातानंतर दुरुस्तीसाठी येणारा संपूर्ण खर्च बीमा कंपनीकडून भरला जातो, तोही कोणताही डेप्रिसिएशन न धरता.
सामान्य कार इन्शुरन्समध्ये गाडीच्या पार्ट्सवर गाडीच्या वयोमानानुसार डेप्रिसिएशन लागतो. म्हणजेच, विमा रक्कम काही टक्के कपातीनंतर मिळते. मात्र, झिरो डेप्थ इन्शुरन्समध्ये गाडी कितीही जुनी असो, तिच्या प्लास्टिक, फायबर, रबर, मेटल बॉडी आणि पेंट वर्क यांसारख्या सर्व पार्ट्सवर पूर्ण क्लेम मिळतो.
हा इन्शुरन्स घेतल्यावर अपघाताच्या वेळी सुरुवातीस आपल्याला काहीही खर्च करावा लागत नाही. संपूर्ण खर्च विमा कंपनीच उचलते. त्यामुळे नवीन कार घेणाऱ्या आणि अपघाताची भीती वाटणाऱ्या लोकांनी झिरो डेप्थ इन्शुरन्सचा विचार जरूर करावा.
advertisement
काय झिरो डेप्थमध्ये काय कव्हर होत नाही?
कारचे टायर
बॅटरी
इंजिन डॅमेज (जर वेगळा इंजिन प्रोटेक्शन प्लॅन घेतला नसेल तर)
हा इन्शुरन्स प्रीमियम थोडा जास्त असतो, पण अपघाताच्या वेळी जो आर्थिक फटका बसतो तो टाळण्यासाठी झिरो डेप्थ इन्शुरन्स सुरक्षित आणि शहाणपणाचा पर्याय ठरतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 09, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
कारचं रबर, प्लास्टिक, पेंट सगळं कव्हर होतं, तुमच्याकडे कार असेल तर झिरो डेप्थ इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहित असायलाच हवं