Bike: दुपारी सुद्धा बाइक आणि स्कुटरचा हेडलाईट का सुरू राहतो? बंद का होत नाही?
- Published by:sachin Salve
Last Updated:
रस्त्यावर तुम्ही पाहिलं असेल की दुचाकी किंवा स्कुटरचा हेडलाईट हा सुरूच असतो.
रस्त्यावर तुम्ही पाहिलं असेल की दुचाकी किंवा स्कुटरचा हेडलाईट हा सुरूच असतो. गाडी सुरू केली केलं की लाइट सुरू होतो पण तो बंद होत नाही. हेडलाईट बंद करण्यासाठी कोणतं स्विच सुद्धा दिलं नाही. त्यामुळे काही जणांनी हेडलाईट कायम सुरू असल्यामुळे बॅटरीवर याचा परिणाम होतोय, मायलेज सुद्धा कमी झालं असा दावा केला. त्यामुळे त्यांनी गॅरेजवाल्याकडून नवीन स्विच लावून घेतलं. पण असं काही होत नाही. हेडलाईट सुरू राहण्यामागे एक नियम आहे.
आधीच्या गाड्यांमध्ये हेडलाईट सुरू करण्यासाठी स्विच होतं. रात्र झाली की लोक स्विच ऑन करायचे. पण 1 एप्रिल २०१७ पासून नियम बदलण्यात आला. या नियमामुळे हेडलाईट हाय बीम आणि लो बीममध्ये बदल करता येत होता. पण वाढते रस्ते अपघात पाहता केंद्रीय परिवहन मंत्रालयाने दुचाकी वाहनांमध्ये ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन (AHO) फिचर आणण्याचे आदेश दिले.
advertisement
...म्हणून हेडलाईट राहतो सुरू
ऑटोमॅटिक हेडलाईट सुरू ठेवण्यामागे महत्त्वाचं कारण होतं ते रस्ते अपघात. दुचाकी वाहनांची दृश्यमानता वाढवण्याचा मुख्य हेतू होता. अनेक देशांमध्ये हा नियम बऱ्याच वर्षांआधीच लागू झाला. अमेरिका आणि युरोप सारख्या देशामध्ये या नियमाचं कडक पालन केलं जातं. दृश्यमानता चांगली राहिल्यामुळे रस्ते अपघाताचं प्रमाण कमी झालं.
AHO फिचर नेमकं कशासाठी?
छोटी वाहनं ही रस्त्यावर असल्यावर त्यांची दृश्यमानता ही कमी असते, त्यामुळे मोठ्या वाहनांना लवकर दिसून येत नाही. जर पाऊस पडला असेल किंवा धुकं पडली असेल तर छोटी वाहनं दिसत नाही. अशामुळे वाहनांची धडक लागण्याची जास्त शक्यता असते. अशामध्ये जर दुचाकी किंवा स्कुटरचं हेडलाईट हे कायम सुरू राहिलं तर समोरून येणाऱ्या वाहनांना लगेच दिसून येईल, त्यामुळे पुढील अनर्थ टळेल.
advertisement
बॅटरी खराब होते का?
अनेक लोकांचं म्हणणं आहे की, ही AHO फिचरमुळे बॅटरीची लाइफ कमी होते. सतत हेडलाईट सुरू असल्यामुळे बॅटरी लवकर डाऊन होते. वारंवार बॅटरी बदलावी लागते. पण हेडलाईट कायम सुरू जरी राहिला तरी बॅटरीवर याचा कोणताही परिणाम होत नाही, असं एक्सपर्ट्सने स्पष्ट केलं.
मायलेज कमी होतं का?
सध्या मार्केटमध्ये लाँच झालेल्या अनेक बाइकमध्ये अडव्हान्स बॅटरी दिली जाते. सोबतच पर्यायी सुविधा सुद्धा दिली जाते. जरी तुम्ही बाइकमध्ये वेगळे लाईट लावले किंवा हॉर्न लावला तर याचा बॅटरीवर कोणताही परिणाम होत नाही. कशाही प्रकार लोड बॅटरीवर येत नाही. AHO सिस्टममुळे मायलेजवर कोणताही परिणाम होत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 05, 2025 9:01 PM IST