Yamaha ची सुपर R-15 ते MT-15 बाइक झाली आणखी स्वस्त, कंपनीकडून खास ऑफर

Last Updated:

यामाहाने मोटरसायकल्‍स आणि स्‍कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्‍स जाहीर केले आहे.

News18
News18
मुंबई: केंद्र सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल केला आहे. आता यापुढे २८ टक्के जीएसटी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपासून आता ५, १२, १८ आणि ४० टक्के जीएसटी कर प्रणाली अंमलात येणार आहे. याचा परिणाम ऑटो इंडस्ट्रीमध्ये झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी कार उत्पादक कंपन्यांनी किंमती कमी केल्या आहेत. अशातच आता नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा (Yamaha Motor Company) मोटर्सने महाराष्ट्रासाठी  नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा केली आहे. यामध्ये  संपूर्ण दुचाकी श्रेणीवर विशेष विमा फायदे आणि RayZR 125 Fi hybrid स्‍कूटरवर कॅशबॅक ऑफर्स दिली आहे.
महाराष्‍ट्र नवरात्रीचा उत्‍सवी उत्‍साह साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना इंडिया यामाहा मोटर प्रदेशामधील ग्राहकांसाठी स्‍पेशल ऑफर्स घेऊन आली आहे. या प्रसंगी यामाहा त्‍यांच्‍या लोकप्रिय मोटरसायकल्‍स आणि स्‍कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅकसह विशेष डिल्‍स जाहीर केले आहे. ज्‍यामुळे ही तुमच्‍या पसंतीची यामाहा दुचाकी खरेदी करण्‍याची परिपूर्ण वेळ आहे.
Yamaha ची नवरात्रीची ऑफर काय?  
- R15 V4: या बाईकवर जवळपास Rs.15,734 पर्यंत जीएसटी फायदा मिळणार आहे तसंच 6,560 रुपयांचा विमा फायदे दिला जाणार आहे.
advertisement
- MT-15 या बाईकवर जवळपास 14,964 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 6,560 रुपये विमा फायदे
- FZ-S Fi Hybrid:  ही यामाहाची पहिली हायब्रिड बाईक आहे. या बाईकवर 12,031रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि  6,501 रुपये विमा फायदे
- Fascino 125 Hybrid: या बाईकवर 8,509 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 5,401 रुपये विमा फायदे
- RayZR 125 Fi: वर 7,759 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि  3,799 रुपये फायदे मिळणार आहे.
advertisement
यामाहाच्‍या मोटरसायकल्‍स आणि स्‍कूटर्सच्या किंमतीत जीएसटीच्या कर प्रणालीत झालेल्या बदलामुळे दरात फरक जाणवणार आहे. त्यामुळे तुमच्‍या जवळच्‍या यामाहा डिलरशिपला भेट देऊन किंमत जाणून घेऊ शकतात.
मराठी बातम्या/ऑटो/
Yamaha ची सुपर R-15 ते MT-15 बाइक झाली आणखी स्वस्त, कंपनीकडून खास ऑफर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement