छत्रपती संभाजीनगरच्या लेकाला तब्बल दीड कोटींची स्कॉलरशिप! आशियातून पहिला

Last Updated:

अर्हत हा मूळचा छत्रपती संभाजी नगरचाच रहिवासी. तो नुकताच बारावी उत्तीर्ण झाला. त्याला विज्ञान शाखेतून 70 टक्के गुण मिळाले.

+
ही

ही स्कॉलरशिप मिळवणारा तो आशियातला पहिला विद्यार्थी ठरला आहे.

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : परदेशी जाऊन उच्चशिक्षण घ्यावं हे स्वप्न अनेक विद्यार्थी उराशी बाळगतात. घरची परिस्थिती उत्तम असेल तर अभ्यासात मेहनत करून हे स्वप्न साकार करता येऊ शकतं. परंतु आर्थिक पाठबळ नसेल तर मात्र हे स्वप्न स्वप्नच राहू शकतं. परंतु या परिस्थितीवरही मात करत अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप मिळवून परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचं आपलं स्वप्न साकार करतात. छत्रपती संभाजीनगरातील अर्हत धाबे या विद्यार्थ्याला चक्क अमेरिकेत जाऊन शिकण्याची संधी मिळालीये. विशेष म्हणजे त्यानं काही लाखांची नाही, तर तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळवली आहे. यासाठी त्यानं नेमके काय प्रयत्न केले, जाणून घेऊया.
advertisement
अर्हत हा मूळचा छत्रपती संभाजी नगरचाच रहिवासी. तो नुकताच बारावी उत्तीर्ण झाला. त्याला विज्ञान शाखेतून 70 टक्के गुण मिळाले. अर्हत सांगतो, 'मला बारावीनंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. काहीतरी वेळ करायचंय या विचारानेच मी इंटरनेटवर शोध घेत होतो. त्यातूनच मला कळलं की, आपण परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो. मग त्याबद्दल मी सखोल माहिती गोळा केली. त्यानंतरच मला ही स्कॉलरशिप मिळाली आहे.'
advertisement
अर्हतला अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात 1831 साली स्थापन झालेल्या लाग्रांज कॉलेजची 1 कोटी 60 लाख रुपयांची 'प्रेसिडेंट्स स्कॉलरशिप' मिळालीये. विशेष म्हणजे ही स्कॉलरशिप मिळवणारा अर्हत हा आशियातला पहिला विद्यार्थी ठरला आहे. स्कॉलरशिप मिळण्यापूर्वी त्यानं एका ठिकाणी 5 महिने इंटर्नशिप केली होती. तिथंदेखील 4 हजार विद्यार्थ्यांमधून 600, मग त्यातून 15 विद्यार्थ्यांची निवड झाली, ज्यात अर्हत होता. त्याला स्कॉलरशिपसाठी अनेक परीक्षा द्याव्या लागल्या, मग त्याचा इंटरव्ह्यू झाला. सर्व प्रश्नांची अर्हतने मोठ्या आत्मविश्वासानं उत्तरं दिली. त्याच्या मेहनतीचंच फळ त्याला या स्कॉलरशिपच्या रूपानं मिळालंय असंच म्हणावं लागेल.
advertisement
एप्रिलमध्ये या इंटरव्ह्यूचा निकाल लागला. आपली स्कॉलरशिपसाठी निवड झालीये हे कळताच अर्हतचा आनंद गगनात मावेनासा झाला. 'मी फक्त 17 वर्षांचा आहे. एवढ्या लहान वयात एवढी मोठी स्कॉलरशिप मिळाली याचा खूप आनंद होतोय. यात माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकलो नसतो', असं अर्हतने सांगितलं. आता तो अमेरिकेत जाऊन त्याचं 4 वर्षांचं पदवीचं शिक्षण घेईल. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
मराठी बातम्या/करिअर/
छत्रपती संभाजीनगरच्या लेकाला तब्बल दीड कोटींची स्कॉलरशिप! आशियातून पहिला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement