Career Choice: करिअर निवडीचा गोंधळ नाहीसा होणार, विद्यार्थ्यांच्या हाती येणार ‘करिअर कार्ड'
- Published by:
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Career choice: ‘करिअर कार्ड’ हे इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. या कार्डमध्ये करिअर निवडण्यासाठी उपयुक्त असलेली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पुणे: इयत्ता दहावी आणि बारावीनंतर ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे उभा राहतो. योग्य माहितीअभावी अनेकदा करिअरची निवड करताना गोंधळ उडतो. पण, आता विद्यार्थ्यांची ही चिंता दूर होणार आहे. कारण, त्यांच्या हाती ‘करिअर कार्ड’ येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने (एससीईआरटी), शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर कार्ड’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
'करिअर कार्ड'मध्ये 13 वेगवेगळ्या क्षेत्रांतील 500 हून अधिक करिअर पर्यायांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक पर्यायासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, संधी आणि संबंधित संस्थांची माहिती इत्यादी बाबींच्या या कार्डमध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी हे कार्ड मार्गदर्शक ठरणार आहे.
कार्डमध्ये नेमकं काय असेल?
‘करिअर कार्ड’ हे इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. या कार्डमध्ये करिअर निवडण्यासाठी उपयुक्त असलेली सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये करिअरसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, संबंधित शिक्षण व प्रशिक्षण, कामाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. या सगळ्या बाबी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य करिअर निवडण्यास मदत करतील.
advertisement
कार्डचं वितरण लवकरच
हे करिअर कार्ड लवकरच राज्यभरातील शाळांमध्ये वितरित केलं जाणार आहे. सध्या या कार्डची भाषांतर प्रक्रिया सुरू आहे. भाषांतर पूर्ण झाल्यानंतर एससीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील हे कार्ड ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ‘करिअर कार्ड’ दिशादर्शक ठरणार आहे. भविष्यात कोणते क्षेत्र निवडावे, याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असणारा गोंधळ या उपक्रमामुळे कमी होईल.त्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य करिअर निवडण्यास मदत होईल, असे शिक्षण विभागातील अधिकारी संगीता बांगर यांनी सांगितले.
advertisement
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या निवडीबाबत अधिक स्पष्टता मिळेल. शिक्षक, समुपदेशक आणि पालक हे करिअर कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. परिणामी, विद्यार्थी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य क्षेत्र निवडून अधिक आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करू शकतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 2:47 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Career Choice: करिअर निवडीचा गोंधळ नाहीसा होणार, विद्यार्थ्यांच्या हाती येणार ‘करिअर कार्ड'


