Career Tips: लाखो फॉलोअर्स अन् बक्कळ पैसा; सोशल मीडिया क्रिएटर कसं व्हायचं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट यापैकी कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन केला की त्यावर भरमसाठ एन्फ्लुएन्सर्स दिसतात. अगदी युट्युब आणि लिंक्डइनवर देखील त्यांचा बोलबाला आहे. गेल्या काही वर्षांत (विशेषत: कोरोना काळापासून) सोशल मीडियावर एन्फ्लुएन्सर्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
नवी दिल्ली: फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, स्नॅपचॅट यापैकी कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन केला की त्यावर भरमसाठ एन्फ्लुएन्सर्स दिसतात. अगदी युट्युब आणि लिंक्डइनवर देखील त्यांचा बोलबाला आहे. गेल्या काही वर्षांत (विशेषत: कोरोना काळापासून) सोशल मीडियावर एन्फ्लुएन्सर्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यांना 'कंटेंट क्रिएटर्स' असं देखील म्हटलं जातं. नवीन आणि ओरिजिनल कंटेंट तयार करण्यासाठी हे लोक आपली कौशल्यं वापरत आहेत.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध शैलीतील कंटेंट क्रिएटर्सचा गौरव केला होता. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच माहिती दिली की, आयआयटी आणि आयआयएमप्रमाणे आयआयआयसी इन्स्टिट्युटची स्थापना केली जाणार आहे. 'इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इमर्सिव्ह क्रिएटर्स' असा आयआयआयसीचा अर्थ होतो. हे केंद्र मुंबईत बांधलं जाणार असून तिथे कंटेंट क्रिएटर बनण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि अभ्यासक्रम शिकवले जातील. कंटेंट क्रिएटर होण्यासाठी तुमच्याकडे कोणती कौशल्यं असली पाहिजेत, याची माहिती याठिकाणी दिली आहे.
advertisement
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स कोण असतात?
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स आपली कौशल्य आणि ओरिजनल आयडियांनी लोकांना प्रभावित आणि प्रेरित करतात. ते टेक्नॉलॉजी, फूड, लाईफस्टाईल, एज्युकेशन, लॉ, सीए, ब्युटी, फॅशन, एंटरटेन्मेंट, कॉमेडी अशा अनेक जॉनरचा कंटेंट तयार करतात. त्यांच्या कामामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
1) प्रॉडक्ट रिव्हु
2) सर्व्हिस रिव्हु
3) लाईफस्टाईल टिप्स
advertisement
4) ट्रॅव्हल व्हिडिओ
5) फूड रेसिपी व्हिडिओ/ फूड रिव्हु
6) फॅशन आणि ब्युटी टिप्स
7) एक्सरसाइज आणि फिटनेस टिप्स
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सची कमाई किती असते?
फॉलोअर्स, रीच आणि इंगेजमेंटनुसार सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सची अनेक विभागणी केली जाते. त्यानुसार त्यांना महिन्याला पैसे मिळतात. आता अनेक ब्रँड्स प्रमोशनसाठी सेलिब्रिटींऐवजी एन्फ्लुएन्सर्सना प्राधान्य देत आहेत.
advertisement
1) नॅनो-एन्फ्लुएन्सर(1,000 ते 10,000 फॉलोअर्स)
2) मायक्रो-एन्फ्लुएन्सर(10,000 ते 100,000 फॉलोअर्स)
3) मिड-टिअर एन्फ्लुएन्सर(100,000 ते 500,000 फॉलोअर्स)
4) मॅक्रो-एन्फ्लुएन्सर(500,000 ते 1 मिलियन फॉलोअर्स)
5) सेलिब्रिटी एन्फ्लुएन्सर(1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स)
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर होण्यासाठी कोणती कौशल्य लागतात?
1) कंटेंट क्रिएशन: ओरिजिनल आणि चांगल्या दर्जाचा कंटेंट तयार करणाऱ्यांना सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळते.
advertisement
2) स्टोरी टेलिंग: तुमचे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्सना आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे गोष्ट सांगण्याची कला असणं गरजेचं आहे.
3) व्हिज्युअल कंटेंट: आकर्षक व्हिडिओ, फोटो आणि ग्राफिक्स तयार करण्याचं कौशल्य असलं पाहिजे.
4) रायटिंग स्किल: आकर्षक आणि ओघवत्या शब्दांत कंटेंट लिहिता यायला हवा.
5) व्हिडिओ एडिटिंग: व्हिडिओ एडिट करण्याचं कौशल्य असलं पाहिजे.
6) ऑडिओ-व्हिज्युअल प्रॉडक्शन: चांगला दर्जा असलेला ऑडिओ-व्हिज्युअल कंटेंट तयार करता आला पाहिजे.
advertisement
7) ब्रँडिंग: स्वत:चं ब्रँडिंग करण्याचं कौशल्य असलं पाहिजे.
8) मार्केटिंग: आपला कंटेंट लोकांपर्यंत पोहचवण्याची क्षमता पाहिजे.
9) सोशल मीडिया मॅनेजमेंट: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स मॅनेज करता आले पाहिजेत.
10) अॅनॅलिटिक्स: आपण तयार केलेला कंटेंट अॅनलाईज करण्याचं कौशल्य असलं पाहिजे.
11) टाइम मॅनेजमेंट: वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे.
12) कम्युनिकेशन स्किल: आपले फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्सशी संवाद साधता आला पाहिजे.
advertisement
13) क्रिएटिव्हिटी: नवीन आणि वेगळ्या आयडिया डेव्हलप करता आल्या पाहिजेत.
14) टेक्निकल स्किल्स: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि टूल्सचा योग्य उपयोग करता आला पाहिजे.
15) अडॅप्टॅबिलिटी: बलणारे ट्रेंड्स आणि टेक्निक्सशी जुळवून घेता आलं पाहिजे.
Keywords - Social Media, Social Media Influencers, IIIC
Link - https://hindi.news18.com/news/career/education-career-tips-how-to-become-social-media-influencers-in-india-content-creation-course-iiic-high-paying-work-from-home-jobs-8703741.html
वृषाली
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2024 10:35 PM IST


