भारतीय संरक्षण दलात सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल बनल्या धनश्री सावंत; पाहा त्यांचा प्रवास? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कर्नल पदी पदोन्नती झाल्याबद्दल सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा हा क्रांतीकारांचा, शूरवीरांचा, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचं सातारा जिल्ह्यातून भारतीय संरक्षण दलामध्ये पहिली महिला कर्नल होण्याचा बहुमान साताऱ्यातील लिंब गावातील संपतराव लक्ष्मण सावंत यांची द्वितीय कन्या धनश्री सावंत-जगताप यांनी मिळवला आहे. त्या सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहेत. कर्नल पदी पदोन्नती झाल्याबद्दल सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
कुठे झाले शिक्षण?
कर्नल धनश्री सावंत यांचे नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, उच्च माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री कॉलेजात झाले आहे . त्यांनी सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. कर्नल धनश्री सावंत यांचे वडील अभियंता संपतराव लक्ष्मण सावंत आणि आई ज्योत्स्ना संपतराव सावंत यांची द्वितीय धनश्री ही कन्या आहेत. धनश्री यांचे पती देविकीरण जगताप (भरतगाववाडी) हे नौदलात कॅप्टनपदी कार्यरत आहेत.
advertisement
महिन्याला तब्बल 90 हजार रुपये पगार, तरी सोडली नोकरी कारण...
कोणतीही सैन्यदलाची पार्श्वभूमी नसताना संपतराव सावंत यांची मोठी मुलगी आणि कर्नल धनश्री सावंत यांची मोठी बहीण भाग्यश्री सावंत या नौदलात गेल्या आणि त्यांचाच आदर्श, मार्गदर्शन घेऊन धनश्री यांनी भारतीय संरक्षण दलामध्ये जाण्याचा निर्धार केला. भारतीय संरक्षण दलात 2002 मध्ये धनश्री सावंत यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून यशस्वीरीत्या त्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अरुणाचल प्रदेश, तेजपूर, बारामुल्ला, उरी, श्रीनगर, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद, दिल्ली अशा ठिकाणी त्यांनी उत्कृष्टरीत्या कामगिरी देखील बजावली आहे, असं धनश्री यांचे वडील संपतराव सावंत यांनी सांगितले.
advertisement
भंगारातून घेतलं यंत्र अन् हमालानं उभारली कंपनी, आज लाखोंची उलाढाल, Video
view commentsसर्व मुले उच्च शिक्षण घेऊन त्यांना उच्च पद मिळाल्यानंतरचा आनंद खूप मोठा होता. लग्नानंतर सून म्हणून, आई म्हणून आणि देश सेवा याची सांगड योग्य पद्धतीने धनश्री यांनी घातली असल्याचं त्यांच्या आईने सांगितले आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
February 06, 2024 10:13 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
भारतीय संरक्षण दलात सातारा जिल्ह्यातून पहिल्या महिला कर्नल बनल्या धनश्री सावंत; पाहा त्यांचा प्रवास? Video

