photos : महिन्याला तब्बल 90 हजार रुपये पगार, तरी सोडली नोकरी कारण...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
आजकाल जवळपास प्रत्येकाला नोकरी तसेच व्यवसाय करायचा आहे. करिअर करायचे आहे. मात्र, काही जण असे असतात, जे चांगल्या पगाराची नोकरी सोडून समाजसेवेसाठी आपल्या आयुष्यातील वेळ देतात. आज एका अशाच तरुणाबाबत जाणून घेऊयात, ज्याने तब्बल 90 हजाराची नोकरी सोडली. (राधिका कोडवानी, प्रतिनिधी)
उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथून वंदे भारत पदयात्रेच्या माध्यमातून इंदूर येथे आलेल्या आशुतोष पांडे या तरुणाशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, तो बॅगेत दोन जोडी कपडे आणि काही पुस्तके घेऊन ते पदयात्रेला निघाला आहे. तो कुठे जात आहे, हे एक महिनाभर कुणालाच कळले नाही. घरच्यांनी त्याला घरी परतायला सांगितले. मात्र, त्याने पर्यावरणासाठी काही करायचे असेल तर यासारखे प्रयत्न करावे लागतील.
advertisement
25 वर्षांच्या आशुतोषने सांगितले की, 2022 मध्ये मी नोकरी सोडल्यामुळे कुटुंबीय नाराज होते. त्यांना सांगणे कठीण होते. मात्र, मी निर्णय घेतला होता. 90 हजारांची नोकरी मी यासाठी सोडली. पुन्हा 2023 साठी वंदेभारत पदयात्रेची सुरुवात केली. मात्र, आता 2 महिन्यांनी आई वाराणसी येथे भेटायला आली, तेव्हा त्यांचा सन्मान केला. त्यानंतर जेव्हा नागरिकांनी त्यांच्या पाया पडल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी त्यांना वाटले माझा निर्णय आणि माझे ध्येय चुकीचे नाही आहे.
advertisement
advertisement
या यात्रेवर निघालेल्या आशुतोषने सांगितले की, बीएससी केल्यानंतर दिल्लीत त्याला 90 हजार रुपये महिन्याची नोकरी मिळाली होती. दिल्लीत राहिल्यादरम्यान, प्रदुषणामुळे मला त्रास होत होता. वाढत्या प्रदूषणाची चिंता होत होती. यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी त्याने नोकरी सोडली आणि पायी यात्रेवर निघाला. आता तो ज्या शहरातून जातो, तिथे तो त्या लोकांशी भेटतो आणि त्यांना वृक्षारोपण तसेच पर्यावरणासंदर्भात जागरूक करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
advertisement
advertisement
त्याने सांगितले की, 74 जिल्ह्यात जाणे झाले. ठिकठिकाणी शेकडो तरुणांनी सामाजिक संस्थांशी चर्चा करून तेथे रोपे लावली. देशाचे संरक्षण, राष्ट्र उभारणी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे हा या यात्रेचा उद्देश आहे. कारण पैसा नव्हे मानवी मूल्ये महत्त्वाची आहेत. यावेळी इंदूरमध्ये स्वच्छतेसोबतच हिरवळही पाहायला मिळाली, इतर शहरांनी इंदूरकडून शिकण्याची गरज आहे, असे मत त्याने मांडले.


