डाॅ. सायमन मॅक यांची यूनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी नियुक्ती
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ. सायमन मॅक यांची यूनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे.
मुंबई : भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस विद्यापीठ म्हणून मान्यता पावलेल्या युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीने सिलिकॉन व्हॅलीमधील विस्तृत अनुभव असलेले व्यूहरचनाकार, आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉ. सायमन मॅक यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रा. तरुणदीप सिंग आनंद यांनी या नियुक्तीची घोषणा केली.
एखाद्या परदेशी, विशेषतः अमेरिकेन आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकाची भारतीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक होण्याची ही पहिलीच घटना असून याद्वारे अमेरिकन विद्यापीठाच्या दर्जाचा वैश्विक अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठात प्रथमच सुरू होत आहे.
डॉ. सायमन मॅक यांचे कुलगुरूपदी स्वागत करताना युनिव्हर्सल ए आय् युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रा. तरुणदीप सिंग आनंद म्हणाले, "भारतीय विद्यापीठीय शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशी नागरिक कुलगुरू म्हणून नेमले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. डाॅ. मॅक यांच्या अमेरिकेतील शैक्षणिक व व्यावसायिक कारकिर्दीतील अनुभवांचा विद्यापीठामध्ये अमेरिकेच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम घडविण्यात उपयोग होईल आणि त्याद्वारे येथील विद्यार्थी परदेशी न जाता मायदेशीच आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतील".
advertisement
युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीचे कुलगुरूपद स्वीकारताना डॉ. सायमन मॅक म्हणाले, "युनिव्हर्सल ए आय् युनिव्हर्सिटीने कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाशी संबंधित अभ्यासक्रम योजून पदवी व पदव्युत्तर शिक्षणामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. भारत जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर असताना जगभरातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि स्टार्टअप्सचे नेतृत्व करण्यासाठी युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिभावान तरुण उद्यमी नेतृत्व, कार्यकुशल व्यवस्थापक निर्माण करण्यासाठी जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम निर्माण करण्यावर आमचा भर असेल".
advertisement
डॉ. मॅक विद्यापीठाच्या विविध मान्यता, श्रेणी, नामांकन, अभ्यासक्रमाचा दर्जा, विविध पदवी अभ्यासक्रमांचे आयोजन व आरएखन, शैक्षणिक विकास व सामुदायिक सेवा इत्यादी विभांगात आपला अनुभव प्रदान करतील. डॉ. मॅक यांनी यापूर्वी कारुथ इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्योरशिपचे कार्यकारी संचालक आणि एसएमयू कॉक्स स्कूल ऑफ बिझनेसच्या रणनीती, उद्योजकता आणि व्यवसाय अर्थशास्त्र विभागात प्रॅक्टिसचे प्राध्यापक म्हणून सेवा केली आहे. डॉ. मॅक यांनी एमआयटी, यूएसए मधून बी.टेक पदवी प्राप्त केली तर एसएमयू कॉक्स स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि पीएच.डी. पूर्ण केले. त्यांनी सिलिकॉन व्हॅली आणि जपानमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून सेवा दिली आहे. त्यांनी ब्लॉकचेन स्टार्टअप्सवर संशोधन करण्यासाठी लंडन, बर्लिन, माल्टा, क्वालालंपूर, सिंगापूर, इस्रायल, बीजिंग आणि शांघाय येथे प्रवास केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2024 2:40 PM IST


