AI Romance Scam अलर्ट! मुंबईत शेजारणीनं घातला तब्बल 7 लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मुंबईतील एक महिला AI मुळे संकटात सापडली आहे. AI Romance Scam हे नवीन प्रकरण समोर आलं आहे. यामाध्यमातून मुंबईतील एका महिलेला तब्बल 7 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात.
मुंबई : सोशल मीडियाचा वापर वाढत असताना आता AI टेक्नोलॉजीचा समावेश झाला आहे. AIनं अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र ज्या गोष्टींचे चांगले परिणाम असतात तसेच त्याची दुष्परिणाम देखील असतात. साइबर क्राइमची प्रकरणं वाढत असताना त्यांना आता AIची मदत मिळाली आहे. AIचा वापर करुन फसवणूक करण्याची प्रकरणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईतील एक महिला AI मुळे संकटात सापडली आहे. AI Romance Scam हे नवीन प्रकरण समोर आलं आहे. यामाध्यमातून मुंबईतील एका महिलेला तब्बल 7 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात.
मुंबईतील एक महिलेला AIचा वापर करुन गंडा घालणारी दुसरी देखील महिलाच होती. एका 37 वर्षांच्या महिलेनं आपल्याच शेजारी राहणाऱ्या महिलेकडून 7 लाख रुपये वसूल केले आहेत. AIचा वापर करुन तिनं एका माणसाचा आवाज तयार केला आणि 7 लाख रुपयांची फसवणूक केली.
advertisement
पीडित महिला ही अनेक दिवस नोकरीच्या शोधात होती. या महिलेचं वय 34 वर्ष असून ती विधवा आहे. रश्मी कार असं आरोपी महिलेचं नाव असून आरोपी महिलेनं आपल्या नवऱ्याच्या मदतीनं शेजारी राहणाऱ्या महिलेची फसवणूक केली.
हे प्रकरण जवळपास 7 महिन्यांपासून सुरू झालं होतं. रश्मी कार हिनं अभिमन्यू मेहरा नावानं पीडित महिलेला फोन केला. रश्मी कार हिनं तुमचा नंबर दिला असं पीडित महिलेला सांगितलं. तुम्हाला नोकरीची गरज असल्याचं देखील सांगितलं. या फोननंतर पीडित महिला आणि अभिमन्यू मेहरा यांचं चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर दोघे रिलेशनमध्ये होते. पण दोघांची कधीच भेट झाली नाही. याच काळात पीडित महिलेनं 8 लाख रुपये अभिमन्यू मेहराच्या अकाउंटला ट्रान्सफर केले.
advertisement
पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिनं अनेकदा अभिमन्यूला भेटण्यासाठी बोलावलं होतं. पण तो नेहमी नकार देत राहिला. त्यानं पीडित महिलेला एक ब्लॅंकेट देखील गिफ्ट केली होती. आपली फसवणूक झाली असं जेव्हा पीडित महिलेच्या लक्षात आलं तेव्हा तिनं पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणानंतर आरोपी महिला आणि तिचा पती दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी रश्मी कार हिनं AI चा वापरु करुन फसवणूक केल्याचं कबूल केलं. Voice changing App वापरुन पीडित महिलेशी पुरुष म्हणून बोलत होती. त्यासाठी तिनं एक खास नंबर घेतला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2024 8:23 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
AI Romance Scam अलर्ट! मुंबईत शेजारणीनं घातला तब्बल 7 लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?


