झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून अशीही मदत! गणेश देतायत MPSC-UPSC करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत झेरॉक्स, Video

Last Updated:

आपण अनुभवलेली परिस्थिती आणि समाजाचं काही तरी देणं लागतो. या भावनेतून पुण्यातील गोखलेनगरमध्ये झेरॉक्सचे दुकान चालवणारे गणेश पवार हे MPSC आणि UPSC करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या झेरॉक्स सेंटरमधून फुकट झेरॉक्स देतात.

+
News18

News18

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आपण अनुभवलेली परिस्थिती आणि समाजाचं काही तरी देणं लागतो. या भावनेतून पुण्यातील गोखलेनगरमध्ये झेरॉक्सचे दुकान चालवणारे गणेश पवार हे MPSC आणि UPSC करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या झेरॉक्स सेंटरमधून फुकट झेरॉक्स देतात. इतकेच नाही तर प्रीलिम परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना ते अभ्यास करण्यासाठी मोफत लायब्ररी देतात. स्वतः स्पर्धा परीक्षा देता आली नाही त्यामुळे याच गरीब विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतःला पाहतात आणि हे कार्य करतात. गणेश पवार यांच्या कार्यामुळे आजपर्यंत अनेक अधिकारी बनले आहेत. विद्यार्थ्यांसाठी ते केवळ झेरॉक्स देत नाहीत तर ते त्यांना मार्गदर्शन देखील करतात.
advertisement
गणेश पवार सांगतात की, 1980 साली वडिलांचे निधन झाले. वयाच्या पाचव्या वर्षी हे सगळं अनुभवलं. त्यानंतर आईने 5 भावंडांना सांभाळलं. हे सगळं पाहत मी वयाच्या पाचव्या वर्षीच मॅच्युअर झालो होतो. आई फार कष्ट करत आम्हाला खाऊ घालत होती. कोणी देईल ते आम्हाला जेवण द्यायची असं करत तिने आम्हाला मोठं केलं. मी हे सगळं लहान असताना पाहिलं आणि शिकून गेलो की अन्नासाठी ही आईला एवढं झटावं लागत आहे. पुढे आईने मजुरी काम करायला सुरुवात केली. आठवीत असताना हॉटेलमध्ये कपबशी धुणे अशी छोटी मोठी कामे करत राहिलो कारण आईवर भार येऊ नये. पुढे काम करत शिक्षण देखील पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण ही केलं आहे.
advertisement
त्यानंतर पुढे झेरॉक्स सेंटर सुरू करत मुलं यायला लागली आणि त्यांची स्टोरी ऐकत होतो. आई वडील काय करतात? शेती करतात? मोलमजुरी करतात? जे आपल्याला अन्न पुरवतात त्यांच्या मुलांची परिस्थिती बेकार आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे. समाजाचं काही तरी देणं लागतो. खूप मोठं नाही पण छोटं काही तरी करू शकतो. यासाठी MPSC आणि UPSC प्रिलिम पास केल्यानंतर पैसे नसतील तर मोफत माझ्याकडे झेरॉक्स देतो पण पोस्ट काढत जा असं चॅलेंज द्यायचो.
advertisement
लहानपणी आईला सांगायचो मी कलेक्टर होईल परंतु परिस्थितीने साथ नाही दिली. आपण नाही झालो तरी आपलं स्वप्न त्यांच्यात बघू शकतो. पुढे दोन अभ्यासिका सुरू केल्या. प्रिलिम पास झाल्यानंतर पुढे मेन्सची तयारी करण्यासाठी झेरॉक्सची गरज असते कामाची गरज असते. परिस्थिती नाही तर तिथे तुम्ही मोफत येऊन बसू शकता, असं गणेश पवार सांगतात.
advertisement
झेरॉक्स सेंटरमधूनच सगळा घरखर्च हा करत असतो. त्यामुळे इतर आर्थिक गरजा आहे ह्या कमी आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तसंच कोरोनामध्ये आपण पाहिलंत की जगण्यासाठी किती गोष्टी लागतात. थोड्या गरजा कमी करून आपण समाजासाठी काही तरी करू शकतो. मी अगदी छोटंसं काम करतो या मुलांना सगळ्यांची जाण असल्यामुळे ते कधी ही विसरत नाहीत. 2002 पासून दुकान होतं मग नंतर 2013 नंतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना मदत करायला सुरुवात केली. ते आज अनेक मुलांनी पोस्ट देखील मिळवल्या आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं, अशा भावना या गणेश पवार यांनी व्यक्त केल्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/करिअर/
झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून अशीही मदत! गणेश देतायत MPSC-UPSC करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत झेरॉक्स, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement