HSC Result : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल लागणार या तारखेला, कसा पाहायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची परीक्षा असते. त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची परीक्षा असते. त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेलं आहे. अशातच निकालची तारीख समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जास्त दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही.
कधी लागणार बारावीचा निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटी लागू शकतो. साधारणपणे 5 मे ते 10 मेदरम्यान बारावीचा निकाल जाहीर होईल, असं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे. 15 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
advertisement
बारावीचा निकाल कुठे पाहता येईल?
कसा पाहाल निकाल?
1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी या बोर्ड परीक्षेचा निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करतं.
advertisement
2) Maharashtra HSC result 2024 लिंक आपल्याला होम पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
3) एक विंडोज ओपन होईल. त्यामध्ये रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
4) यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. लगेच तुम्हाला निकाल दिसेल.
5) या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट काढू शकता तसेच डाऊनलोड सुद्धा करु शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2025 8:11 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
HSC Result : प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल लागणार या तारखेला, कसा पाहायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर


