3 वेळा अपयश, पण निर्धार पक्का; नुकताच फौजदार झालेला शेतकरी पुत्र काय सांगतोय ऐका..!
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
लहानपणापासूनच प्रसाद विध्वंस याला पोलीस शिपाई, देशाच्या सीमेवर रक्षण करणारा जवान किंवा कोणत्याही प्रकारची वर्दी मिळवण्याची इच्छा होती.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: अंगावर खाकी वर्दी चढवून देशसेवा करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी जिद्द, चिकाटीने काहीजण प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळं यशही त्यांच्या पायाशी लोळण घेतं. असाच काहीसा प्रवास जालना जिल्ह्यातील घनसावंगीच्या शेतकरी पुत्राचा आहे. लहानपणापासून खाकी वर्दीचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मात्र, 3 वेळा यशानं हुलकावणी दिली. पण अपयशानं खचून न जाता प्रसाद विध्वंस याने प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तो फौजदार झाला आहे. या यशानंतर गावकऱ्यांनी त्याची जंगी मिरवणूक काढली.
advertisement
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली हे प्रसाद विध्वंस याचं गाव आहे. त्याचे आई-वडील अल्पशिक्षित असून शेतकरी आहेत. लहानपणापासूनच प्रसादला पोलीस शिपाई, देशाच्या सीमेवर रक्षण करणारा जवान किंवा कोणत्याही प्रकारची वर्दी मिळवण्याची इच्छा होती. अनेक वेळा त्याने पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती देखील केली. मात्र एक किंवा दोन मार्कांनी त्याची संधी गेली.
advertisement
दोन वर्ष केली शेती
प्रसादच संपूर्ण शिक्षण त्याच्या मामाकडे नांदेड येथे झाले. 2017 मध्ये तो पीएसआय पदाच्या तयारीसाठी पुणे येथे गेला. तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर कोविड आल्यामुळे त्याला गावी परतावं लागलं. 2020 ते 22 अशी दोन वर्ष त्यानं शेती देखील केली. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. 2022 मध्ये निघालेल्या जाहिरातीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामधील गुणवत्ता यादीमध्ये प्रसादच नाव आलं आहे. त्यामुळे प्रसाद पीएसआय होणार हे निश्चित झालंय.
advertisement
आई-वडिलांना विसरणार नाही
view commentsपोलीस उपनिरीक्षक व्हावं, ही माझी लहानपणापासूनची इच्छा होती. हा प्रवास खूप मोठा होता. या प्रवासात अनेकांनी साथ दिली, संघर्षात मदत केली. आई-वडिलांची साथ आयुष्यभर विसरणार नाही. अडचणीच्या वेळी त्यांनी पैसे पाठवले. अनेक मित्रांनी ही अडीचडीच्या काळात मदत केली. पीएसआय असलेले माझे मामा हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याकडे पाहूनच मला पीएसआय होण्याची ओढ लागली. पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर समाजातील विविध प्रश्न मार्गी लावणे हे माझं ध्येय असणार आहे, असं प्रसाद विध्वंस याने सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 09, 2024 3:04 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
3 वेळा अपयश, पण निर्धार पक्का; नुकताच फौजदार झालेला शेतकरी पुत्र काय सांगतोय ऐका..!

