हॉटेलमध्ये काम करत अभ्यास, आता सरकारी शाळेत मिळाली शिक्षकाची नोकरी, दिव्यातील प्रेरणादायी गोष्ट!

Last Updated:

बाजीराव हे मूळ नांदेडचे आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बीएडचे शिक्षण करताना तर त्यांनी हॉटेलमध्ये टेबल पुसण्याचे कामही केले होते.

+
बाजीराव

बाजीराव घुंगरराव

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : कॉलेजच्या दिवसात पाहिलेल्या स्वप्नांवर योग्य मेहनत घेतली, तर पाहिलेले स्वप्न नक्कीच एक दिवस पूर्ण होतं. दिव्यातील बाजीराव घुंगरराव यांनी सुध्दा कॉलेजच्या दिवसांत गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करण्यासाठीच स्वप्न पाहिलं होतं आणि आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.
बाजीराव हे मूळ नांदेडचे आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. बीएडचे शिक्षण करताना तर त्यांनी हॉटेलमध्ये टेबल पुसण्याचे कामही केले होते. या सगळ्या परिस्थितीवर मात करत त्यांनी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून सरकारी नोकरी मिळवली. आता ते पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून भरती झाले आहेत. त्यांचा हा प्रवास कसा होता आहे, हे लोकल18 च्या टीमने जाणून घेतला.
advertisement
ठाण्यात एकाच ठिकाणी मिळते 10 पेक्षा अधिक प्रकारची पावभाजी, खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, 'माझ्या या संपूर्ण प्रवासात मला माझ्या कुटुंबीयांची, माझ्या पत्नीची आणि राहुल या माझ्या सहकारी मित्राची खूप साथ मिळाली. परीक्षा दिली त्यावेळेस खरंच वाटलं नव्हतं की आपण ही परीक्षा क्रॅक करू. परंतु इतक्या वर्षांच्या मेहनतीचे हे फळ असावे,' या शब्दात बाजीराव घुंगरराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बाजीराव हे एक प्रेरणास्थान आहेत. जवळपास दहाहून अधिक परीक्षा देऊनही यश मिळत नसताना ते खचून गेले नाहीत. तर, त्यांनी जिद्दीने पुढील परीक्षेचा अभ्यास केला आणि हे यश मिळवले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
हॉटेलमध्ये काम करत अभ्यास, आता सरकारी शाळेत मिळाली शिक्षकाची नोकरी, दिव्यातील प्रेरणादायी गोष्ट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement