advertisement

Ajit Pawar Death: महाराष्ट्र सुन्न! अजित दादांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा; मराठी सिनेसृष्टीचा मोठा निर्णय

Last Updated:

Ajit Pawar Death: दादांच्या निधनामुळे राज्यावर दुःखाचे सावट असून, चित्रपट आणि नाट्यसृष्टीनेही आपले सर्व व्यवहार थांबवून या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

News18
News18
मुंबई : आजची सकाळ महाराष्ट्रासाठी नियतीचा एक क्रूर घाला घेऊन आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आणि अवघा महाराष्ट्र एका क्षणात पोरका झाला. बारामतीकडे झेपावणाऱ्या त्या विमानाचा अपघात केवळ राजकीय क्षेत्रालाच नाही, तर संपूर्ण मनोरंजन विश्वाला चटका लावून गेला आहे. दादांच्या निधनामुळे राज्यावर दुःखाचे सावट असून, चित्रपट आणि नाट्यसृष्टीनेही आपले सर्व व्यवहार थांबवून या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

'लग्न पंचमी'चा प्रयोग रद्द; अमृता-स्वप्नील भावूक

अजित पवार यांचे मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी मनोरंजन विश्वही सुन्न झाले. स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'लग्न पंचमी' या गाजलेल्या नाटकाचा आज पुण्यात प्रयोग होणार होता. मात्र, दादांच्या निधनामुळे धक्का बसलेल्या टीमने तातडीने आजचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
नाटकाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "आजच्या या अत्यंत दुःखद घटनेमुळे आम्ही शोकाकुल आहोत. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही आजचा प्रयोग रद्द करत आहोत." अमृता खानविलकरनेही ही पोस्ट आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे. केवळ नाटकच नाही, तर अनेक आगामी चित्रपटांच्या टीमनेही आपापले टीझर, ट्रेलर आणि पोस्टर लाँचचे सोहळे पुढे ढकलले आहेत.
advertisement
advertisement

मराठी सिनेसृष्टीत दुःखाचं सावट

मराठी अस्मितेचा विषय मांडणाऱ्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचा आज महत्त्वाचा प्रेस शो आणि प्रीमियर होणार होता. मात्र, निर्मात्यांनी तातडीने हे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, बहुप्रतिक्षित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाच्या टीमने पुढील दोन दिवस कोणतीही प्रमोशनल पोस्ट, रिल्स किंवा इंटरव्ह्यू प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. कलेपेक्षा माणसाचा सन्मान मोठा, हीच भावना आज संपूर्ण सिनेसृष्टीत पाहायला मिळत आहे.
advertisement
advertisement
तसेच, चिंचवड येथे होणारा 'द फोल्क आख्यान'चा २९ जानेवारीचा प्रयोगही रद्द करण्यात आला आहे. "महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या शोकाकुल वातावरणात आम्ही आख्यानाचा थाट मांडू शकत नाही," अशा शब्दांत आयोजकांनी आपली हळहळ व्यक्त केली.
advertisement

तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

अजित दादांच्या निधनामुळे राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी २०२६ असे तीन दिवसांचे दुखवटा जाहीर केला आहे. या काळात कोणतेही शासकीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. दादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ajit Pawar Death: महाराष्ट्र सुन्न! अजित दादांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा; मराठी सिनेसृष्टीचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement