FSSAI Vacancy 2024 : फूड सेफ्टी अथॉरिटीमध्ये नोकरीची संधी, दीड लाखांपेक्षा जास्त पगार; काय आहे पात्रता?

Last Updated:

FSSAI Vacancy 2024: FSSAI मध्ये गट A आणि B पदांसाठी रिक्त जागा आहेत. इच्छुक उमेदवारांना 29 जुलैपर्यंत ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
मुंबई : तुम्ही ग्रॅज्युएट असाल व नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. फूड सेफ्टी अथॉरिटीमध्ये तुम्हाला नोकरी करायची असेल तर एक संधी आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) काही रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. एफएसएसएआयमध्ये ग्रुप ए व बी पदांसाठी व्हेकन्सी आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही एफएसएसएआची ऑफिशियल वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
फूड सेफ्टी अथॉरिटीच्या या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज 14 जुलैपर्यंत करता येतील. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 29 जुलै 2024 पर्यंत आलेल्या हार्ड कॉपी स्वीकारल्या जातील, त्यानंतर स्वीकारले जाणार नाही. यासंदर्भात जास्त माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाइटला भेट देऊ शकता.
आवश्यक पात्रता
असिस्टंट डायरेक्टच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री पूर्ण केली असणे आवश्यक आहे. यासोबतच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, फायनान्स, ह्यूमन रिसोर्स, डेव्हलपमेंट डिपार्टमेंट्समध्ये काम करण्याचा सहा वर्षांचा अनुभवही असणं गरजेचं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात, या पदांसाठी तीन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
advertisement
व्हेकन्सी डिटेल्स
एफएसएसएआयच्या या रिक्त पदांच्या माध्यमातून असिस्टंट डायरेक्टरची पाच पदं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची सहा पदं भरली जातील. भारतात ज्या ठिकाणी एफएसएसएआयचे ऑफिस असतील, त्याठिकाणी निवडलेल्या उमेदवारांना पोस्टिंग दिली जाईल.
इतका मिळणार पगार
- एफएसएसएआयमध्ये ग्रुप ए आणि बी ऑफिसर लेव्हलवरील पदं आहेत, ज्यामध्ये उमेदवारांना आकर्षक पगार मिळतो.
- असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना (पे लेव्हल -10) 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये पगार दिला जाईल.
advertisement
- ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना (पे लेव्हल- 8) 47,600 ते 1,51,100 रुपये पगार दिला जाईल.
अर्ज कसा करायचा
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची नियुक्ती पोस्टिंग डेप्युटेशनच्या माध्यमातून केली जाईल. उमेदवारांना अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेआधी संबंधित कागदपत्रांच्या फोटोकॉपी जोडून एफएसएसएआय ऑफिसमध्ये ऑफलाइन अर्ज पाठवावा लागेल.
advertisement
अर्ज करण्याचा पत्ता
असिस्टंट डायरेक्टर, एफएसएसआय हेडक्वार्टर, थर्ड फ्लोअर, एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवावा लागेल.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
FSSAI Vacancy 2024 : फूड सेफ्टी अथॉरिटीमध्ये नोकरीची संधी, दीड लाखांपेक्षा जास्त पगार; काय आहे पात्रता?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement