Vastu Tips: आपली सही (स्वाक्षरी) कशी असावी? प्रगतीसाठी या गोष्टी कायम ध्यानात ठेवा

Last Updated:

Vastu Tips For Signature : स्वाक्षरीच्या खाली काढलेली रेषा योग्य की अयोग्य? स्वाक्षरी काढण्याविषयी वास्तुशास्त्र काय सांगतं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून.

News18
News18
मुंबई : जेव्हा आपण एखाद्या खास व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याचा ऑटोग्राफ किंवा स्वाक्षरी घेतो. काही विशेष कागदपत्रे तयार करताना आपल्याला स्वतःची स्वाक्षरी करावी लागते. आपल्याला काही लोकांच्या स्वाक्षऱ्या आवडतात, आकर्षक स्वाक्षरी ही एक कला आहे, जी प्रत्येकाची वेगळी असते. पण, अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल की स्वाक्षरी केल्यानंतर लोक त्याखाली एक रेषा काढतात. वास्तुशास्त्रातही स्वाक्षरीबाबत काही नियम सांगितले आहेत. आपण चुकीच्या पद्धतीनं सही करत असू तर आपलं नुकसान होऊ शकतं, असे मानले जाते.
वास्तविक, स्वाक्षरी नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारे पाहिली जाते. स्वाक्षरीच्या खाली काढलेली रेषा योग्य की अयोग्य? स्वाक्षरी काढण्याविषयी वास्तुशास्त्र काय सांगतं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून.
रेषा स्वाक्षरीपेक्षा मोठी असावी -
स्वाक्षरीबाबत वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपण सही केल्यानंतर एक रेषा काढू शकता. पण लक्षात ठेवा की, तुम्ही स्वाक्षरीच्या खाली रेषा काढत असाल तर ती तुमच्या स्वाक्षरीपेक्षा मोठी असावी. यासह ही रेषा सरळ असावी.
advertisement
तिरकी रेषा म्हणजे प्रगतीत अडथळा -
आपण स्वाक्षरीखाली रेषा काढत असाल आणि ती वाकडी असेल तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. वास्तुशास्त्रानुसार, वाकडी रेषा तुमच्या स्वाक्षरीचा मार्ग कट करते आणि जर तुमची स्वाक्षरी कट होत असेल तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी आणते.
advertisement
एकापेक्षा जास्त रेषा मारू नका -
अनेकजण स्वाक्षरी केल्यानंतर एकापेक्षा जास्त रेषा काढतात. असे करणे चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वाक्षरीच्या खाली एकापेक्षा जास्त ओळींचा अर्थ जीवनात गोंधळ समजला जातो. म्हणजे तुम्ही कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि नेहमी गोंधळातच राहाल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: आपली सही (स्वाक्षरी) कशी असावी? प्रगतीसाठी या गोष्टी कायम ध्यानात ठेवा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement