SSC Stenographer पदासाठी पात्रता काय? किती मिळतो पगार?
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
स्टेनोग्राफी शिकून तुम्ही सरकारी नोकरी सहज मिळवू शकता. तसेच कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीत (एमएनसी) चांगल्या पगाराची नोकरीही मिळवता येते.
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. आपल्या आवडीनुसार, पात्रतेनुसार कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 10 ते 25 हजार रुपयांची नोकरी सहज मिळवता येते. 'स्टेनोग्राफी'देखील त्यापैकीच एक. स्टेनोग्राफी शिकून तुम्ही सरकारी नोकरी सहज मिळवू शकता. तसेच कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीत (एमएनसी) चांगल्या पगाराची नोकरीही मिळवता येते. त्यामुळे आज आपण SSC Stenographer म्हणजेच कर्मचारी निवड आयोग अंतर्गत स्टेनोग्राफर होण्यासाठीची आवश्यक पात्रता जाणून घेऊया.
शॉर्टहॅन्ड टायपिंग करण्यासाठी मंत्रालयांमध्ये स्टेनोग्राफर नियुक्त केले जातात. हे एक अतिशय प्रतिष्ठित काम असल्याने SSC स्टेनोग्राफरच्या वेतनात दरमहा मूळ वेतनासह घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA), महागाई भत्ता (DA) इत्यादी विविध भत्त्यांचा समावेश असतो. तुम्हालाही मंत्रालयात किंवा सरकारी विभागात कर्मचारी निवड आयोगातर्फे नोकरी मिळवायची असेल, तर खालील बाबी व्यवस्थित समजून घ्या.
advertisement
स्टेनोग्राफरचे प्राथमिक काम:
भाषण लेखन: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भाषणाची नोंद घेणे.
ब्रीफिंग: पत्रकार परिषदांना उपस्थित राहणे. प्रसिध्दीपत्रक तयार करण्यासाठी संक्षिप्त नोट्स प्रदान करणे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत करणे: कामकाज सुरळीत पार पडावं, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना मदत करणे.
जनसंपर्क: सरकारचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंपर्क अधिकारी कार्यरत असतात. त्यांना मदत करणे.
advertisement
निवड प्रक्रिया :
स्टेनोग्राफर उमेदवारंची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाते.
दरम्यान, ग्रेड सी आणि डी पदांच्या SSC स्टेनोग्राफरचा पगार सारखा नसतो. ग्रेड ‘सी’ स्टेनोग्राफरचा पगार ग्रेड ‘डी’ स्टेनोग्राफरपेक्षा अधिक असतो. शिवाय या पदांसाठी इयत्ता बारावी आणि स्टेनोग्राफीचं प्रशिक्षण ही शैक्षणिक अट असते.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Aug 04, 2023 5:33 PM IST








