फक्त 1.51 लाखात व्हाल MBBS डाॅक्टर; देशातलं 'हे' टाॅप काॅलेज करेल तुमची स्वप्नपूर्ती, अशी आहे प्रवेश प्रक्रिया!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
IMS BHU (Banaras Hindu University) भारतातील सर्वोत्तम आणि परवडणाऱ्या मेडिकल कॉलेजपैकी एक आहे. येथे 5.5 वर्षांचा MBBS कोर्स अवघ्या 1.51 लाख रुपयांत पूर्ण करता येतो. IMS BHU मध्ये 100 जागा आहेत आणि...
देशात अशी काही वैद्यकीय महाविद्यालयं आहेत, जिथे तुम्ही खूप कमी फी मध्ये MBBS चा अभ्यास पूर्ण करू शकता. ही महाविद्यालयं निवडक आणि चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये गणली जातात. आज आपण अशाच एका महाविद्यालयाबद्दल जाणून घेणार आहोत…
IMS BHU ची देशात सातवी रँकिंग
दर वर्षी देशात कॉलेजांची NRIF रँकिंग जाहीर केली जाते. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय सातव्या क्रमांकावर आहे. या महाविद्यालयाचं नाव आहे बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IMS BHU). हे महाविद्यालय वैद्यकीय शिक्षणासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. इथून कमी खर्चात डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना MBBS (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी) करण्याची उत्तम संधी मिळते.
advertisement
BHU मध्ये MBBS : किती जागा, किती फी?
बनारस हिंदू विद्यापीठाच्या IMS BHU मध्ये MBBS चा कोर्स 66 महिने म्हणजेच साडेपाच वर्षांचा आहे. इथे एकूण 100 MBBS जागा उपलब्ध आहेत. या कोर्सची एकूण ट्यूशन फी आहे 149463 रुपये. याशिवाय काही अतिरिक्त फी देखील भरावी लागते. उदाहरणार्थ, एकदाच 1800 रुपये द्यावे लागतात. त्यानंतर नावनोंदणी फी, प्रवेश फी, ओळखपत्र, कॉलेज सिक्युरिटी मनी आणि पदवी फी यासारखे शुल्कही भरावे लागतात. अशा प्रकारे, इथे MBBS करण्याचा एकूण खर्च 1.51 लाख रुपये होतो. म्हणजेच, फक्त 1.51 लाख रुपयांत साडेपाच वर्षांचं MBBS शिक्षण इथे पूर्ण होऊ शकतं.
advertisement
BHU NEET रँकिंग : प्रवेश NEET रँकिंगवर
BHU च्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये प्रवेश NEET रँकिंगवर आधारित होतो. BHU मध्ये MBBS साठी कटऑफ रँक दरवर्षी बदलते, जे जागांची संख्या, उमेदवारांचं प्रदर्शन आणि कॅटेगरीवर अवलंबून असते. गेल्या वर्षीच्या प्रवेशांवरून असं म्हणता येईल की, जनरल कॅटेगरीसाठी रँक 1000 च्या आत, OBC साठी 1700 च्या आत आणि SC/ST साठी त्यांच्या कॅटेगरीनुसार असावी लागते.
advertisement
NEET स्कोअर : प्रवेशासाठी किती गुण हवेत?
- जनरल कॅटेगरी: जर तुमची NEET रँक 1000-1100 च्या आसपास असेल, तर BHU मध्ये प्रवेशाची चांगली संधी आहे. मागील ट्रेंडनुसार, जनरल कॅटेगरीसाठी 675+ (720 पैकी) गुण हवेत.
- OBC कॅटेगरी : OBC विद्यार्थ्यांना रँक 1500-1700 च्या दरम्यान असल्यास संधी मिळू शकते. यासाठी 660+ गुण असावेत.
- SC/ST कॅटेगरी : SC साठी रँक 15000-16000 आणि ST साठी 24000-25000 असल्यास BHU मध्ये जागा मिळू शकते. गुण 580+ आणि 550+ असावेत.
- EWS कॅटेगरी : मागील वर्षांत EWS साठी कटऑफ 1700 च्या आसपास होता.
advertisement
या महाविद्यालयातून कमी खर्चात चांगलं वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 28, 2025 3:09 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
फक्त 1.51 लाखात व्हाल MBBS डाॅक्टर; देशातलं 'हे' टाॅप काॅलेज करेल तुमची स्वप्नपूर्ती, अशी आहे प्रवेश प्रक्रिया!