2 लाख 40 हजार सॅलरीची नोकरी हवीये? तत्काळ भरा हा फॉर्म, रेल्वेमध्ये जॉबची संधी
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 एप्रिल 2024 आहे.
मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. रेल्वे मंत्रालयाची कंपनी RITES Ltd. येथे विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आलीय. यामध्ये दरमहा 2 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगाराच्या पदाचाही समावेश आहे. कंपनीनं इंजिनीअर, प्रोजेक्ट लीडर, रेसिडेंट इंजिनीअर अशा विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 एप्रिल 2024 आहे. तर, नोकरीसाठी नियुक्ती 12 एप्रिल ते 16 एप्रिल 2024 याकाळात इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल.
31 रिक्त पदांसाठी भरती
या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 31 रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ज्यामध्ये प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल) 1, टीम लीडर (सिव्हिल) 5, डिझाइन एक्सपर्ट (सिव्हिल) 6, रेसिडेंट इंजिनीअर (ट्रॅक) 3, रेसिडेंट इंजिनीअर (सिव्हिल) 5, रेसिडेंट इंजिनीअर (एस अँड टी) 4, रेसिडेंट इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) 5, इंजिनीअर (डिझाईन) 1 या पदांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी कमाल वय 16 एप्रिल 2024 रोजी 55 वर्षे असावं.
advertisement
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व अनुभव किती असावा, हे जाणून घेऊ.
- प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बॅचलर पदवी आणि बांधकाम उद्योगात 20 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
- टीम लीडर (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बॅचलर पदवी आणि बांधकाम उद्योगात 15 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
advertisement
- डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीई किंवा बी.टेक किंवा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम.टेक आणि 10 वर्षांचा अनुभव असावा.
- रेसिडेंट इंजिनीअर (ब्रिज) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि बांधकाम उद्योगात 10 वर्षांचा कामाचा अनुभव असावा. डिप्लोमा असेल तर 15 वर्षांचा अनुभव असावा.
- रेसिडेंट इंजिनीअर (ट्रॅक) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी आणि रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये काम करण्याचा 10 वर्षांचा अनुभव असावा.
advertisement
- रेसिडेंट इंजिनीअर (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी आणि बांधकाम उद्योगात 10 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
- रेसिडेंट इंजिनीअर (एस अँड टी) पदासाठी बी.टेक किंवा बी.ई किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. उमेदवाराकडे पदवी असेल तर 10 वर्षांचा अनुभव आणि डिप्लोमा असल्यास 15 वर्षांचा अनुभव असावा.
- रेसिडेंट इंजिनीअर (इलेक्ट्रिकल) पदासाठी बी.टेक किंवा बी.ई किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. उमेदवाराकडे पदवी असेल तर 10 वर्षांचा अनुभव आणि डिप्लोमा असल्यास 15 वर्षांचा अनुभव असावा.
advertisement
- इंजिनीअर (डिझाइन) पदासाठी स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगमध्ये एम.टेक किंवा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. उमेदवाराकडे पदवी असेल तर 10 वर्षांचा अनुभव आणि डिप्लोमा असल्यास 15 वर्षांचा अनुभव असावा.
किती मिळेल पगार?
या भरतीप्रक्रियेंतर्गत नोकरीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 30,000 - 1,20,000 ते 90,000 – 2,40,000 अशा वेगवेगळ्या पे स्केल प्रमाणे दर महिन्याला पगार मिळेल. पदानुसार सीटीसी अर्थात वर्षाला मिळणारे एकूण वेतन हे वेगवेगळे आहे. ही सीटीसी 08.45 लाख ते 24.47 लाखाच्या दरम्यान आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार कंपनीची अधिकृत वेबसाइट https://www.rites.com ला भेट देऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 09, 2024 11:31 AM IST