युवकांसाठी नोकरीची संधी! कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेडमध्ये लेखनिक पदांसाठी भरती

Last Updated:

Kolhapur District Urban Cooperative Bank Recruitment 2025: कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मार्फत लेखनिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तरुणांना करिअरच्या दृष्टिकोनातून एक नवे व्यासपीठ मिळू शकते.

Kolhapur District Urban Cooperative Bank Recruitment 2025
Kolhapur District Urban Cooperative Bank Recruitment 2025
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मार्फत लेखनिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तरुणांना करिअरच्या दृष्टिकोनातून एक नवे व्यासपीठ मिळू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 15 जागांसाठी ही भरती होत असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 22 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

पदाचे तपशील काय आहे?

  • पदाचे नाव: लेखनिक
  • पदसंख्या: 15
  • नोकरी ठिकाण: कोल्हापूर

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वयोमर्यादा: 22 ते 35 वर्षे

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या उमेदवारांची योग्य पात्रता आणि आवश्यकतेनुसार उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून या संस्थेत निवड होऊ शकते. उमेदवार आपले करिअर सुरू करू शकतात.
advertisement

अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना काय काळजी घ्यावी ?

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या लेखनिक पदाच्या भरतीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यासाठी आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर इच्छुक उमेदवारांसाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आलेले आहेत. त्याची संपूर्ण माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया करावी.
advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2025 

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या भरतीला इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असल्यास आपण कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक सहकारी असोसिएशन लिमिटेडची अधिकृत वेबसाईट https://kopbankasso.com/ आहे, जिथे अर्जाबाबतच्या सर्व शंकांचं निरसन करण्यात आलेलं आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
युवकांसाठी नोकरीची संधी! कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेडमध्ये लेखनिक पदांसाठी भरती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement