कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती, 10 उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
10 वी पास असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
कोल्हापूर : 10 वी पास असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय विभागात नोकरी मिळणार आहे.
सदर भरतीची जाहिरात ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
एकूण रिक्त जागा : 95
advertisement
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) – 01
2) शिपाई (महाविद्यालय) – 03
3) मदतनीस (महाविद्यालय) – 01
4) क्ष-किरण परिचर (रुग्णालय)- 07
5) शिपाई (रुग्णालय) – 08
6) प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) – 03
7) रक्तपेढी परिचर (रुग्णालय) – 04
8) अपघात सेवक (रुग्णालय) – 05
advertisement
9) बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) – 07
10) कक्ष सेवक (रुग्णालय) – 56
शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा म्हणजे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शास्त्र (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हताः तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी. उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकीट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
advertisement
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-]
पगार : 15,000/- ते 63,200/-
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
advertisement
अधिकृत संकेतस्थळ : https://rcsmgmc.ac.in/
अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट देऊन संपूर्ण माहिती वाचून घ्यावी.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 12, 2025 12:28 PM IST


