Pune: 'आई शेतमजूर, बाप गवंडी काम करतो' अर्धपोट जगणाऱ्या MPSC विराची करुण कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
अनेक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पाहिली तर शेतकरी आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी असल्याचे दिसून येते. यामुळे त्या विद्यार्थ्यांना अतिशय हलाखीच्या आणि संघर्षमय परिस्थितीत आपले जीवन जगावे लागते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून दरवर्षी लाखो विद्यार्थी हे पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. अनेक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पाहिली तर शेतकरी आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी असल्याचे दिसून येते. यामुळे त्या विद्यार्थ्यांना अतिशय हलाखीच्या आणि संघर्षमय परिस्थितीत आपले जीवन जगावे लागते. अशी काहीशी परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डालसगावची असलेली अश्विनी पिसाळ या तरुणीची. ही तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत काम देखील करते.
advertisement
'मी गेली तीन वर्ष झालं एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत आहे. पुण्यातील गोखलेनगर भागात राहिला असून बालभारतीमध्ये क्लर्क म्हणून काम करते आणि काम करत असताना कंबाईन, राज्यसेवा आणि तलाठी परीक्षा देत आहे. घरी मी आणि माझ्यानंतर तीन भावंडे असून आई शेतात मजुरी करते तर वडील गवंडी काम करतात.
advertisement
घरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे मला अभ्यास करत काम देखील करावे लागते. कारण लहान भावाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला त्याचं देखील बघावं लागत. तो देखील पुण्यात शिक्षण घेत आहे. अतिशय काटकसर करून महिना काढावा लागतो. 8 हजार रुपये पगारामध्ये अर्धे पैसे हे घरी द्यावे लागतात तर अर्ध्या पैशांमध्ये राहण्याचे भाडे, प्रवास खर्च, जेवण खर्च बघावे लागते. अनेक वेळा तर सकाळी आणि संध्याकाळीच जेवण हे होत',असं अश्विनी पिसाळ सांगते.
advertisement
'या सगळ्यामध्ये लायब्ररीला भरायला पैसे नसतात. परंतु पवार काका म्हणून आहेत त्यांना माझी सगळी परिस्थिती माहिती असल्यामुळे ते माझ्याकडून फक्त 500 रुपये घेतात आणि मला मदत करतात. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ऑफिस करून त्यानंतर 10.30 पर्यंत लायब्ररीमध्ये असते. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात खूपच संघर्ष आहे' असंही अश्विनी पिसाळने सांगितले.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 10, 2025 9:01 PM IST