फक्त 10,000 रुपये गुंतवत उभं केलं 4100 कोटींचं व्यावसायिक साम्राज्य; असा आहे शशी सोनी यांचा प्रवास
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
शशी सोनी यांनी स्वयंपाकघरातून बाहेर पडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. शशी यांनी 1971मध्ये पहिला व्यवसाय सुरू केला. 50 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी तीन ते चार क्षेत्रांमध्ये काम केलं. त्यांनी दहा हजार रुपयांच्या भांडवलावर एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांच्या व्यवसायाचं साम्राज्य 4100 कोटी रुपयांचं आहे.
पूर्वीच्या काळी महिलांच्या खांद्यावर फक्त कुटुंबाची जबाबदारी असायची; पण आता काळ बदलला असून महिला मोठमोठ्या कंपन्यांच्या मालक बनल्या आहेत. यशस्वी महिलांची यशोगाथा कोट्यवधी गृहिणींना काही तरी मोठं काम करण्याची प्रेरणा देतात. शशी सोनी यांची कहाणी अशीच आहे. ही कथा ऐकल्यावर महिलांसह पुरुषांनादेखील मोठा विचार करण्याची प्रेरणा मिळते. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला शशी सोनी यांनी स्वयंपाकघरातून बाहेर पडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. शशी यांनी 1971मध्ये पहिला व्यवसाय सुरू केला. 50 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी तीन ते चार क्षेत्रांमध्ये काम केलं. त्यांनी दहा हजार रुपयांच्या भांडवलावर एक छोटा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांच्या व्यवसायाचं साम्राज्य 4100 कोटी रुपयांचं आहे.
सोनी यांनी 1971मध्ये दहा हजार रुपयांचं भांडवल गुंतवून डीप ट्रान्सपोर्टला सुरुवात केली. 1975पर्यंत त्यांनी हा व्यवसाय चालवला. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृ्ष्टीत प्रवेश केला आणि मुंबईतल्या मुलुंड परिसरात दीप मंदिर सुरू केलं. चित्रपटाच्या दुनियेत प्रवेश केला आणि 1980पर्यंत त्यात त्यांची भरभराट होत राहिली.
advertisement
सिनेमा ते सॉफ्टवेअर, प्रत्येक ठिकाणी यश
पण सोनी यांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. ट्रान्सपोर्टप्रमाणे सिनेमाचा व्यवसाय काही वर्षं चालला; पण नंतर या दोन्ही व्यवसायात एका दशकात अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर सोनी यांनी म्हैसूरमध्ये ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. हा व्यवसाय त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर सोनी यांनी उद्योगक्षेत्रात मागं वळून पाहिलं नाही. वर्षानुवर्षांच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासानंतर 2005मध्ये त्यांनी इज्मो लिमिटेडची स्थापना केली. ही एक ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनी आहे. शशी सोनी या इज्मो लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत. इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग सोल्युशनच्या जगात या कंपनीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची कंपनी उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियात हायटेक ऑटोमोटिव्ह आणि ई-रिटेलिंग सोल्युशन देते. ही कंपनी भारतीय शेअर बाजाराच्या बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर लिस्टेड आहे.
advertisement
व्यवसायासह शशी सोनी सामाजिक कार्यातदेखील सक्रिय आहेत. त्या दीप जनसेवा समितीच्या सदस्य आहेत. ही संस्था महिलांसाठी शिक्षण, पेन्शन योजना आणि दिव्यांग व्यक्तींसाठी फंडिंगचं काम करते. Shashisoni.com या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 500 दशलक्ष डॉलर अर्थात सुमारे 4100 कोटी रुपये आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 15, 2024 12:11 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
फक्त 10,000 रुपये गुंतवत उभं केलं 4100 कोटींचं व्यावसायिक साम्राज्य; असा आहे शशी सोनी यांचा प्रवास


