UPSC Prelims 2024: IAS, IPS होण्यासाठी UPSC परीक्षेला बसण्याचा विचार करताय? सर्वात आधी ही गोष्ट माहिती हवी
- Published by:Rahul Punde
- trending desk
Last Updated:
UPSC Prelims 2024: आम्ही तुम्हाला UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेबद्दल सांगणार आहोत. यासोबतच UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किती टप्पे पार करावे लागतील याचीही माहिती मिळेल.
upscमुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा पास होणं हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं; पण त्यासाठी अहोरात्र अभ्यास करावा लागतो. कारण ही परीक्षा पास होणं फारच आव्हानात्मक असतं. यूपीएससीकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) ही केवळ देशातल्याच नव्हे, तर जगभरातल्या सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेद्वारे देशातल्या उच्च पदांवर नियुक्त्या केल्या जातात. आयएएस, आयपीएस, आएफएस असो किंवा आयआरएस या सर्व सेवांमध्ये नियुक्तीसाठी यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
उच्चपदस्थ अधिकारी बनण्याची इच्छा अनेक तरुणांच्या मनात दिसून येते. एखाद्या प्रभावशाली अधिकाऱ्याला भेटल्यामुळे किंवा घरात सरकारी अधिकारी असल्यामुळे ही इच्छा निर्माण होते. चित्रपट किंवा जाहिराती पाहिल्यानंतरदेखील अनेक तरुण नागरी सेवांकडे आकर्षित होतात. काही दिवसांपूर्वीच आयपीएस मनोजकुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित '12वी फेल' हा चित्रपट आला होता. अनेकदा तरुण असे चित्रपट बघून परीक्षेची तयारी सुरू करतात; पण त्यांना परीक्षेच्या स्वरूपाबाबत आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती नसते.
advertisement
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात प्रीलिम्स म्हणजेच प्राथमिक परीक्षा पास होणं गरजेचं आहे. दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षेचा समावेश असतो. तिसऱ्या टप्प्यात मुलाखत असते. उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होण्यासाठी यूपीएससी उमेदवारांना हे तीन टप्पे पार करावे लागतात. यापैकी कोणत्याही एका टप्प्यात उमेदवार अनुत्तीर्ण झाल्यास तो अधिकारी बनू शकत नाही.
advertisement
पहिल्या टप्प्यात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे दोन पेपर असतात. त्यापैकी पहिला पेपर जनरल सायन्सचा आणि दुसरा पेपर सी-सॅटचा असतो. सी-सॅटमध्ये गणित, इंग्रजी इत्यादी विषयांचे प्रश्न असतात. पहिल्या टप्प्याच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि उमेदवार दुसऱ्या टप्प्यात पोहोचतात. दुसऱ्या टप्प्यात, सब्जेक्टिव्ह स्वरूपात जनरल सायन्सच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान इत्यादी विषयांचे स्वतंत्र पेपर्स असतात. यासोबतच एक ऑप्शनल पेपरही असतो. हे सर्व पेपर उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पोहोचतात. तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी म्हणजेच मुलाखत घेतली जाते. मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार नागरी सेवक अर्थात अधिकारी बनतो.
advertisement
वाचा - 'तुम्ही फक्त माहिती द्या...', बच्चू कडूंचं शोध अभियान, WhatsApp नंबर केला जारी
यूपीएससी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि उमेदवार या परीक्षेत किती वेळा सहभागी होऊ शकतो, हेदेखील विचारात घेतलं जातं. उमेदवाराकडे कोणतीही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून मिळालेली बॅचलर पदवी असणं बंधनकारक आहे. जनरल कॅटेगरीतले उमेदवार वयाच्या 32व्या वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. यासाठी त्यांना सहा वेळा संधी दिली जाते. ओबीसी कॅटेगरीतल्या उमेदवारांना वयाच्या 35व्या वर्षापर्यंत नऊ वेळा संधी दिली जाते. एससी आणि एसटी कॅटेगरीतले उमेदवार वयाच्या 37व्या वर्षापर्यंत कितीही वेळा परीक्षेला बसू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 19, 2024 11:53 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
UPSC Prelims 2024: IAS, IPS होण्यासाठी UPSC परीक्षेला बसण्याचा विचार करताय? सर्वात आधी ही गोष्ट माहिती हवी