कार्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली अन् सुरू केला अभ्यास, नागपूरच्या संस्कारचं UPSC परीक्षेत यश, Video

Last Updated:

UPSC परीक्षेत नागपुरातील एकूण 11 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे नोकरी सोडून अभ्यास करत संस्कार गुप्ता यांनीही या परीक्षेत यश मिळवलं असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

+
कार्पोरेट

कार्पोरेट कंपनी नोकरी सोडली अन् सुरू केला अभ्यास, नागपूरच्या संस्कारचं UPSC परीक्षेत यश, Video

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला. नागपुरातील एकूण 11 विद्यार्थ्यांची यूपीएससी परीक्षेत निवड झाली आहे. यामध्ये प्री-आयएएस प्रशिक्षण केंद्रातील 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रतिष्ठेच्या परीक्षेत नागपुरातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे नोकरी सोडून अभ्यास करत संस्कार गुप्ता यांनीही या परीक्षेत यश मिळवलं असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
संस्कार गुप्ता यांचं यश
युपीएससी परीक्षेत नागपुरातील संस्कार गुप्ता यांनी यश मिळवलंय. श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमधून त्यांनी बीई कॉम्प्युटर केले आहे. 2017 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर बंगळुरूमध्ये कॉर्पोरेट नोकरी सुरू केली. पण ही नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दिल्लीत एक वर्ष क्लास घेतले. त्यानंतर परत नागपुरला येऊन घरी अभ्यास केला आणि हे यश प्राप्त केल आहे. संस्कार हा साधारण घरातून येतो. त्याचे वडील हे व्यापारी असून आई गृहिणी आहे.
advertisement
संस्कारने अपेक्षित यश मिळवलं
युपीएससी परीक्षेतील यशाबद्दल संस्कारच्या आई-वडिलांनी त्याचं कौतुक केलंय. "संस्कार हा आधीपासूनच खूप अभ्यासू आणि हुशार आहे. आम्हाला असं वाटत होतं की हा भविष्य अधिकारी होईल. कारण तो मागील पाच वर्षांपासून सतत अभ्यास करत होता. लहानपणापासूनच त्याची अभ्यासवृत्ती आम्हाला माहिती होती. त्यामुळे तो काहीतरी मोठं करेल हे अपेक्षित होतं, असं आई-वडील सांगतात.
advertisement
कुटुंबानं नेहमीच सपोर्ट केला
"मेहनत करताना कधी कधी खूप वेळ वाट पाहावी लागते. यश प्राप्त होण्यासाठी तेव्हा परिवाराची खूप मदत होते. परिवाराने नेहमी सपोर्ट केलं पाहिजे. आम्ही सर्व त्याच्या सोबत उभे होतो. ज्यावेळेस अपयश येत होतं तेव्हाही त्याच्यासोबत होतो. त्यामुळेच आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला," असे संस्कारचा भाऊ आकाश गुप्ता याने सांगितलं.
advertisement
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 28 मे 2023 रोजी पूर्वपरीक्षा, त्यानंतर 15 ते 24 सप्टेंबर 2023 दरम्यान मुख्य परीक्षा, तर 2 जानेवारीपासून ते मार्चपर्यंत मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मंगळवारी दुपारी यूपीएससीचा नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
कार्पोरेट कंपनीतील नोकरी सोडली अन् सुरू केला अभ्यास, नागपूरच्या संस्कारचं UPSC परीक्षेत यश, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement